आनंद वाटल्यानेच वाढतो
By Admin | Updated: February 15, 2016 01:25 IST2016-02-15T01:25:16+5:302016-02-15T01:25:16+5:30
आनंद हा वाटल्यानेच वाढतो तर दु:ख हे वाटल्याने कमी होते. त्यामुळे समाजात वावरताना समाजाशी एकोप्याने व प्रेमाने राहून हे दैवप्राप्ती होऊ शकते.

आनंद वाटल्यानेच वाढतो
अहेरीत दिव्य सत्संग कार्यक्रम : शून्योजी महाराज यांचे प्रतिपादन
अहेरी : आनंद हा वाटल्यानेच वाढतो तर दु:ख हे वाटल्याने कमी होते. त्यामुळे समाजात वावरताना समाजाशी एकोप्याने व प्रेमाने राहून हे दैवप्राप्ती होऊ शकते. तुमच्यातील प्रेमपूर्वक वागणुकच तुम्हाला मृत्यूनंतरसुध्दा जीवित ठेवते, असे प्रतिपादन परमसंत ब्रह्मस्वरूप सद्गुरू शून्योजी महाराज यांनी केले.
आंतरराष्ट्रीय मानवता परिषद अहेरीच्या वतीने येथील मानव मंदिर राधास्वामी सत्संग भवनात आयोजित ३१ व्या वार्षिक दिव्य सत्संग कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर गुरू मॉ स्नेहा, उजैनच्या आचार्य शोभादेवी भट, हैदराबादच्या आचार्य ज्योतीराणी उपस्थित होत्या. यावेळी शून्योजी महाराज यांनी आपल्या मधूरवाणीतून हजारो भाविकांना महत्त्वपूर्ण उद्देश सांगितला. शून्योजी महाराज यांनी यावेळी जीवनाचे विविध पैलू सांगून सकारात्मक दृष्टिकोन विशद केला.
सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर स्वागत समारोहाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी २ व सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत सत्संग कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला अहेरी, आलापल्ली, सिरोंचा, एटापल्ली, चामोर्शी, पेरमिली, मुलचेरा, आष्टी आदीसह तेलंगणा राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी आंतरराष्ट्रीय मानवता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)