महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:36 IST2021-04-17T04:36:28+5:302021-04-17T04:36:28+5:30
एटापल्ली येथे २५ युवकांचे रक्तदान शिवसेना पक्ष कार्यालय एटापल्ली येथेे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ...

महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
एटापल्ली येथे २५ युवकांचे रक्तदान
शिवसेना पक्ष कार्यालय एटापल्ली येथेे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात२५ युवकांनी रक्तदान केले. शिबिराला शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपाल सुल्वावार, स्टेट बँकेचे व्यवस्थापक मनीष मौर्य, अमित वासनिक उपस्थित हाेते. शिबिरात मनीष मौर्य, अमित वासनिक,राहुल ढबाले, सचिन मोतकुरवार, सूरज जक्कुलवार, किशोर मुल्लेटी, राहुल मेश्राम, रोशन निलीवार, उमेश चिट्टीवार, अंकिता खोब्रागडे, स्नेहा आत्राम, आदित्य चिप्पावार, महेंद्र सुल्वावार, नाजील देवतळे, अरबाज खान, अनिकेत रामटेके, प्रशिक करमरकर, मोहित सेलोटे, जगदीश कांबळे, किशोर मट्टामी, संपत पैडाकुलवार, अनिकेत मामीडवार, रोहित बोमकंटीवार, ओमकार मोहुर्ले, राघव सुल्वावारयांनी रक्तदान केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिवसेना तालुकाप्रमुख मनीष दुर्गे, राघव सुल्वावार, छोटू करमरकर, प्रवीण मेश्राम, बादल चुनारकर, अनिकेत रामटेके, संकेत फुलमाळी, नाजील देवतळे, गुणवंत कांबळे यांनी सहकार्य केले.
घोट येथील चाैकात अभिवादन
घोट : येथील मुख्य चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सी.के. कांबळे, बंडुजी तुरे, दिनकर लाकडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच स्मारक समितीचे अध्यक्ष बंडूजी बारसागडे यांनी निळा ध्वज फडकविला. यावेळी प्रदीप वाकडे, हिवराज फुलझेले, प्रदीप झाडे, जमनादास मेश्राम, दिवाकर मेश्राम, कवडू कुुकुडकर, मच्छिंद्र निमगडे, संजू वाकडे, नामदेव उराडे, सदानंद खोब्रागडे, सौजन्य वनिकर, विजयश्री कांबळे, नगीना दरडे, समीक्षा रामटेके आदी उपस्थित होते.
तसेच आ. डाॅ. देवराव होळी यांनीही येथील मुख्य चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, घोटचे उपसरपंच साईनाथ नेवारे, ग्रा.पं. सदस्य विलास उईके, बंडू तुरे, प्रदीप वाकडे, हिवराज फुलझेले, एच.के. वाळके आदी उपस्थित होते.
स्व. सूरजमल चव्हाण माध्यमिक आश्रमशाळा रेखेगाव /अनंतपूर
येथील दोन्ही आश्रमशाळांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य उत्तम ढोके यांनी प्रतिमेला माल्यार्पण केले. कार्यक्रमाला राजेश नाकाडे, प्रवीण येलेकर, मनोहर नरवाडे, संजय सहारे, किशोर वावरे, चांगुला राऊत, ज्योती जिचकार व शिक्षकेतर कर्मचारी अणि विद्यार्थी उपस्थित होते.
कृषक हायस्कूल चामाेर्शी
येथील कृषक हायस्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी जेष्ठ शिक्षक मोरेश्वर गडकर, लोमेश्वर पिपरे, जासुंदा जनबंधू, लोमेश बुरांडे उपस्थित होते. मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
जा.कृ.बाेमनवार माध्यमिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चामाेर्शी
येथील जा. क्रु. बाेमनवार माध्यमिक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक वासुदेव चांदेकर हाेते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. नमुदेव कापगते, प्रा. संजय भुरभुरे उपस्थित होते. याप्रसंगी जी.एम. मनबतुलवार, नारायण साेनकुसरे, सी.बी. किरमे, घनश्याम मेनेवार, वासुदेव खाडे, ज्ञानदेव उरकुडे उपस्थित हाेते. उपस्थित सर्वांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. संचालन नारायण साेनकुसरे यांनी केले.
शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालय चामाेर्शी
येथील शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयात महात्मा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. भगवान व्ही. धोटे प्रा. सुखसागर झाडे, प्रा. ललिता वसाके, प्रा.निनांद देठेकर प्रा. सोनी आभारे व शिक्षकेतर कर्मचारी सुनील आभारे, सौरव सहारे, भावना सूर, संजय गडकर, आशिष मेश्राम, भावना चांदेकर उपस्थित होते.
ग्रामपंचायत कार्यालय साेनापूर
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय आणि ग्रामपंचायत सोनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी सरपंच गोपिका टेकाम, उपसरपंच शेषराव कोहळे, लुकेश सोमनकर, राेजगार सेवक हितेश सातपुते, गुरुदास टेकाम, प्रवीण टेकाम, सूरज दुधबावरे, प्रवीण गेडाम, मारोती चलाख उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे संचालन आशिष चलाख तर आभार प्रशांत टेकाम यांनी मानले.
आंबेडकर चौकात अभिवादन
कुरखेडा : येथील बौद्ध समाजाच्या वतीने बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती डॉ.आंबेडकर बहुउद्देशीय समाज भवनात साजरी करण्यात आली. बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व केक कापून अभिवादन करण्यात आले. सुरुवातीला सेवानिवृत्त मुख्याध्यापक यादव ढवळे यांच्या हस्ते निळा ध्वज फडकविण्यात आला. यावेळी सामूहिक त्रिशरण, पंचशील ग्रहण करण्यात आले. कार्यक्रमाला माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण टेंभुर्णे, रोहित ढवळे, माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, माजी नगरसेवक ॲड. उमेश वालदे, पुंडलिक देशमुख, महेंद्र माने, डॉ. फुलचंद रामटेके, ग्रामसेवक अनिकेत आकरे, ग्रामसेवक नितीन घोडीचोर, मुन्ना सहारे, स्वप्नील खोबरागडे, नितेश खोब्रागडे, राहुल खोबरागडे, प्रमोद खोब्रागडे, भीमराव जांभुळकर, विशाल जनबंधू ,राजू टेंभुर्णे, ललिता वालदे, सिंधू राऊत व समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.
कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात २० जणांचे रक्तदान
कुरखेडा : स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने घेतलेल्या शिबिरात २० युवकांनी रक्तदान करून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. जय विक्रांता व जिग्नेश क्रिकेट क्लब तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. ही समस्या लक्षात घेऊन रक्तदान शिबिर घेण्यात आले.
शिबिरात नितिन कटरे, रितेश मनुजा, पीयूष नवडागे, कृष्णा गहाणे, निखिल वलके, रोहित जांभुळकर, प्रीतम वालदे, विवेक गजभिये, मयूर साहरे, अंकुश टेंभुर्णे, राजकुमार सहारे, आशितोष वारजुरकर, विवेक पोहनकर, रुपेश चांदेवार, भावेश मुंगणकर, तेजस नेवारे, वैभव वैद्य, सचिन गेडाम आदी युवकांनी एबी पाॅझिटिव्ह गटाचे रक्तदान केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजयुमोचे जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये, मधुकर वारजुकर, ईश्वर ठाकरे, पंकज डोंगरे उपस्थित होते.
रक्तसंकलनाचे काम
वैद्यकीय अधिकारी डॉ. कमलेश परसवानी, डॉ. जगदीश बोरकर, डॉ. प्राजक्ता दुपारे, धम्मप्रिया लाडे, अजय ठाकरे, वसंता नान्हे, रश्मी मोगरे, फाजिल बारी, आशिष विहीरघरे आदींनी वैद्यकीय सेवा दिली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सागर निरंकारी, नौशाद सय्यद, आशिष बागडे, सोनू राहांगडाले, यशपाल सहारे, निर्भय टेंभुर्णे, प्रवेश सहारे यांनी सहकार्य केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक चामोर्शी
येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिरामण लांडे हाेते. यावेळी नामदेव उंदीरवाडे यांनी ध्वजाराेहण केले. प्रमुख अतिथी म्हणून म्हणून चंद्रभोज साखरे, मदन उंदीरवाडे, अनिल भैसारे, वासुदेव वाळके, रमेश मेश्राम, श्रीहरी सोरते, मनोज सोरते व समाजबांधव उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे संचालन बबिता माहाेरकर यांनी केले. यशस्वितेसाठी बाैद्ध समाजाच्या अध्यक्ष संगीता संजय साखरे, भगवान वाघमारे, रेखा रामटेके, पोलीस पाटील सुरेश कोटांगले, सुनील भैसारे, भोजराज साखरे, किशोर कुळवे, सचिन मोटघरे, केशव खंडारे यांनी सहकार्य केले.
महात्मा गांधी महाविद्यालयात आरमोरी
येथील महात्मा गांधी महाविद्यालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. ऑनलाइन पद्धतीने साजरा केलेल्या कार्यक्रमात प्राचार्य डाॅ. लालसिंग खालसा, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. शशिकांत गेडाम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्ययन व संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा. दिलीप घोनमोडे, मराठी विभागाचे प्रा. डॉ. विजय रैवतकर यांनी सहभाग घेतला.
बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातील एकेक कलम आजही प्रासंगिक आहे. त्या कलमाची अंमलबजावणी करणे म्हणजे आंबेडकरांच्या विचारांना चालना देणे हाेय. परंतु स्वार्थी राजकीय नेते सोयीचा अर्थ लावून त्याप्रमाणे कारभार करतात. यामुळे संविधान निर्मात्यांच्या उद्देशाविषयी संभ्रम निर्माण होतो व विकासाची दिशा भरकटते. अशावेळी बाबासाहेबांचे विचार मानणाऱ्या प्रत्येकाने जागरूक राहून जनतेला सावध करण्याची चळवळ उभारली तर लोकशाही व अहिंसक मार्गाने देशात परिवर्तन येऊ शकते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांनी केले. प्रा. दिलीप घोनमोडे यांनी ‘आजच्या परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची प्रासंगिकता’ या विषयावर विचार व्यक्त करताना संविधानातील मूलभूत अधिकार प्रत्येक काळासाठी प्रासंगिक आहेत. कलम १३ ते ३५ पर्यंत दिलेली कलमे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि प्रत्येक नागरिकाला सुरक्षित जीवन जगण्याची हमी देतात. ही जीवनमूल्ये प्रत्येक काळासाठी प्रासंगिक आहेत, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. विजय रैवतकर तर आभार प्रा. शशिकांत गेडाम यांनी मानले. तंत्रसहाय प्रा. सुनील चुटे, प्रा. डॉ. सतीश कोला यांनी सहकार्य केले.
ग्रामसेवक संघटना गडचिराेली
येथील ग्रामसेवक भवनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेतर्फे साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपूरकर, काेषाध्यक्ष खुशाल नेवारे, श्रीकृष्ण मंगर, जयंत मेश्राम, हेमंत गेडाम, नारायण बांबोळे, वैभव कहुरके उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय गडचिराेली
जिल्हाधिकारी कार्यालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्र.तहसीलदार (आस्थापना) के.एस. भांडारकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाला जिल्हा नाझर डी.ए.ठाकरे, विवेक दुधबळे, पी.के. लांडगे, व्ही.बी. चहांदे, जी.आर. मालवी, विजय मोलंगुरवार, नारायणा कोल्हटकर, तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून
अभिवादन केले.
महाराष्ट्र अंंधश्रद्धा निर्मूलन समिती गडचिरोली
अंनिस कार्यालयात महामानव महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. दोन्ही महामानवाच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अंनिसचे जिल्हा उपाध्यक्ष शब्बीर शेख, जेष्ठ सल्लागार पंडित पुडके, जिल्हा कार्याध्यक्ष विलास निंबोरकर, जिल्हा पदाधिकारी पुरुषोत्तम चौधरी, शहर कार्याध्यक्ष भोजराज कानेकर, कमलाकर वारके, वामनराव भोयर, उद्धव बांगरे, गणेश नैताम आदी उपस्थित होते.
आंबेडकरवादी विचार मंचतर्फे कार्यक्रम
गडचिराेली येथे आंबेडकरवादी विचार मंचतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
अध्यक्षस्थानी जनार्दन ताकसांडे होते. प्रमुख अतिथी म्हणून विलास निंबोरकर, प्रमोद राऊत, उध्दव बांगरे उपस्थित होते. जनार्धन ताकसांडे, विलास निंबोरकर, प्रमोद राऊत, उध्दव बांगरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण, पंचशीलाने करण्यात आली. कार्यक्रमाला डंबाजी बाबनवाडे, मंगला बाबनवाडे, नागेश गावडे, अर्चना गावडे, भीमराव गोंडाणे, कल्याणी गोंडाणे, सुषमा ढवळे, प्रिया सुखदेवे, प्रियंका सोनवणे, जितेंद्र फुलझेले, सोनी फुलझेले, अंजली बाबनवाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार पायल बाबनवाडे यांनी मानले.
अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष कार्यालय गडचिराेली
गडचिरोली : अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पक्षाच्या जिल्हा कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून निळा ध्वज फडकविण्यात आला. याप्रसंगी प्रदेश सचिव प्रा.राजन बोरकर, जिल्हा सरचिटणीस हंसराज उंदीरवाडे, कार्यालयीन सचिव अशोक खोब्रागडे, महिला आघाडी शहर अध्यक्ष वनमाला झाडे, महिला आघाडी सरचिटणीस माधुरी शंभरकर, महिला आघाडी शहर उपाध्यक्ष कविता खोब्रागडे, विद्यार्थी फेडरेशन प्रदेश सचिव संदीप रहाटे, माजी नगरसेवक तुळशिराम सहारे, प्रा. अमरीश उराडे, प्राचार्य विष्णू दुर्गम, राकेश नागापुरे, धर्मेंद्र वंजारे, सेवानिवृत्त सहायक पीएसआय सुनील उराडे, आचल मेश्राम उपस्थित होते.
आमदार जनसंपर्क कार्यालय गडचिराेली
येथील आ.डाॅ. देवराव हाेळी यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, भाजप शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, धानोरा तालुका संपर्क प्रमुख अनिल पोहनकर, नगरसेवक केशब निंबोळ, शहर महामंत्री विनोद देवोजवार, झोपडपट्टी आघाडीचे श्याम वाढई, आनंद खोब्रागडे उपस्थित होते.
सम्राट अशोक बुद्ध विहार गांधी वाॅर्ड, देसाईगंज
येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज मंडळाचे अध्यक्ष आनंदराव मेश्राम हाेते. याप्रसंगी पंचरंगी ध्वज समता बौध्द महिला मंडळाच्या अध्यक्ष इंदू तितरे व निळा ध्वज बौध्द धम्म प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ सदस्य एम.ए. रामटेके यांनी फडकविला. यावेळी दि बुध्दिस्ट सोसायटीचे जिल्हा प्रवक्ते विजय बन्सोड, त्रिरत्न समता संघाचे अध्यक्ष चंदुराव राऊत, सुरेश मेश्राम, ललित खोब्रागडे, गौतम लांडगे, गिरीधर मेश्राम, राजविलास गायकवाड, आशा दहिवले, निर्मला रामटेके, देवीदास बन्सोड, संतोष ऊके व सुकेसिनी ऊके उपस्थित हाेते. ध्वजारोहणानंतर बुध्द वंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संचालन गौतम लांडगे तर आभार राजविलास गायकवाड यांनी मानले.