ग्रामसेवक कामबंद आंदोलनावर
By Admin | Updated: June 23, 2014 23:52 IST2014-06-23T23:52:22+5:302014-06-23T23:52:22+5:30
ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या अनेक मागण्यांसाठी ग्रामसेवक २ जुलै २०१४ पासून राज्यव्यापी आंदोलन करणार, असा निर्णय स्थानिक ग्रामसेवक भवनात पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य

ग्रामसेवक कामबंद आंदोलनावर
२ जुलैपासून आक्रमक होणार : मागण्यांसाठी राज्यभर करणार निदर्शने
गडचिरोली : ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या अनेक मागण्यांसाठी ग्रामसेवक २ जुलै २०१४ पासून राज्यव्यापी आंदोलन करणार, असा निर्णय स्थानिक ग्रामसेवक भवनात पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या विभागीय बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य सरचिटणीस अतुल वर्मा होते. यावेळी विभागीय सरचिटणीस अनिल कोहळे, युनियनचे भंडारा जिल्हाध्यक्ष भाजीपाले, बिलोने, विलास चौधरी, काझी, कार्तिक चव्हाण, पी. जी. ठाकरे, प्रदीप भांडेकर, खुशाल नेवारे, पांडूरंग पेशने आदी उपस्थित होते.
ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रुुटी दूर न झाल्यामुळे महाराष्ट्रातील २७ हजार ९२७ ग्रामपंचायतमध्ये कामबंद आंदोलन करण्यात येण्यासंदर्भात ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांना युनियनतर्फे निवेदन देण्यात आले आहे. ग्रामसेवकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये वेतन त्रुटी दूर करणे, ग्रामपंचायतस्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे, कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवाकाळ सेवेत लागलेल्या तारखेपासून ग्राह्य धरणे, २० ग्रा. पं. मध्ये १ विस्तार अधिकारी पद देणे, प्रवासभत्ता ३ हजार रूपये करणे, कंत्राटी ग्रामसेवकांना पेंशन योजनेचा लाभ देण्याबाबत विचार करणे आदींचा समावेश आहे. े संचालन पांडूरंग पेशने तर आभार प्रदीप भांडेकर यांनी मानले. यावेळी दिलीप आष्टेकर, शंकर कुनघाडकर, रमेश बोरकुटे, दयाराम श्रीरामे, बडगू, वंगा वेलादी, रूपेश धुर्वे, कुलसंगे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)