शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं.कडे सात कोटींचे वीज बिल थकीत

By admin | Updated: September 9, 2014 23:30 IST

वेळेवर न होणाऱ्या करवसुलीमुळे बहुतांश ग्रामपंचायती उधारवाडीवरच प्रशासनाचा गाडा हाकत असून पथदिव्यांचे वीज बिलही भरण्यासाठी पैसे राहत नसल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे ७ कोटी १९ लाख

गडचिरोली : वेळेवर न होणाऱ्या करवसुलीमुळे बहुतांश ग्रामपंचायती उधारवाडीवरच प्रशासनाचा गाडा हाकत असून पथदिव्यांचे वीज बिलही भरण्यासाठी पैसे राहत नसल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे ७ कोटी १९ लाख ५८ हजार ३७३ रूपये एवढे वीज बिल थकीत राहिले आहे. वीज वितरण कंपनीकडून याबाबत वेळोवेळी विचारणा करून सुद्धा वीज बिलाचा भरणा करण्यात आलेला नाही.ग्रामपंचायतीला केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजनांसाठी दरवर्षी लाखो रूपयांचा निधी प्राप्त होतो. मात्र सदर निधी संबंधित विकास कामावरच खर्च करण्याचे बंधन आहे. त्यामुळे सदर निधीचा उपयोग ग्रामपंचायत प्रशासन गावाच्या दैनंदिन गरजांसाठी वापरू शकत नाही. गृहकराच्या रूपात नागरिकांकडून गोळा झालेला पैसा पथदिव्यांचे वीज बिल भरणे, हातपंप दुरूस्ती करणे, गावातील नाल्यांचा उपसा करून गावात स्वच्छता राखणे आदी बाबींवर खर्च करता येतो. मात्र बहुतांश नागरिक गृहकराचा भरणा वेळेवर करत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासन अडचणीत येते. जिल्ह्यातील आजही काही ग्रामपंचायतींची ५० टक्केपेक्षा कमी करवसुली झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडे पैसे नसल्याने दैनंदिन खर्च कसा करावा, असा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनासमोर निर्माण होतो. ग्रामपंचायतीच्या सेवेबाबत नेहमीच बोटे मोडणारे नागरिक गृहकर भरण्यास मात्र समोर येत नाही. एका ग्रामपंचायतीमध्ये चार ते पाच गावे समाविष्ट आहेत. प्रत्येक गावासाठी स्वतंत्र वीज कनेक्शन घेण्यात आला आहे. त्याचबरोबर काही ग्रामपंचायतींनाही स्वतंत्र वीज कनेक्शन आहे. असे एकूण जिल्हाभरातील १४१० वीज कनेक्शनचे ७ कोटी १९ लाख ५८ हजार ३७३ रूपयांचे वीज बिल थकले आहे. एका ग्रामपंचायतीकडे २० ते ३० हजार रूपयांपर्यंतचे वीज बिल थकीत आहेत. या ग्रामपंचायतींना चालू बिल भरण्याची सक्ती वीज वितरण कंपनीने केली आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायती चालू वीजबिल भरून आपली पत सांभाळत आहेत. थकीत वीज बिल भरण्याबाबत वीज वितरण कंपनीने ग्रामपंचायत प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र ग्रामपंचायतीकडे पैसाच नसल्याने थकीत बिल देण्यास टाळाटाळ करीत आहेत.गावातील पथदिवे एक दिवसही बंद राहिल्यास गावातील नागरिक सरपंच, ग्रामसेवक यांच्या नावाने ओरडतात. मात्र ग्रामपंचायतीकडे पैसेच नसल्याने पथदिवे लागणार कसे, असे शहाणपण एकाही नागरिकाला सूचत नाही. भविष्यात एखादी ग्रामपंचायतीला चालू बिलाचाही भरणा करणे अशक्य झाल्यास त्यावेळी मात्र गावातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडीत होण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय शिल्लक राहत नाही. त्यामुळे नागरिकांनी गृहकर भरणे आवश्यक झाले आहे. (नगर प्रतिनिधी)