ग्रा.पं. अंतर्गत नाल्यांचे काम निकृष्ट
By Admin | Updated: August 28, 2014 23:47 IST2014-08-28T23:47:52+5:302014-08-28T23:47:52+5:30
आरमोरी ग्रामपंचायतीच्या वतीने सिध्दार्थ नगर वार्ड क्रमांक २ मध्ये १३ व्या वित्त आयोगाच्या निधीतून नालीचे बांधकाम करण्यात येत आहे. परंतु सदर बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात

ग्रा.पं. अंतर्गत नाल्यांचे काम निकृष्ट
चुरमुरा : आरमोरी ग्रामपंचायतीच्या वतीने सिध्दार्थ नगर वार्ड क्रमांक २ मध्ये १३ व्या वित्त आयोगाच्या निधीतून नालीचे बांधकाम करण्यात येत आहे. परंतु सदर बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात असून या बांधकामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी लोकजनशक्ती पार्टीच्यावतीने करण्यात आली आहे.
सिध्दार्थ नगरातील जीवन गेडाम ते गुणवंत रामटेके यांच्या घरापर्यंत नालीचे बांधकाम करण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे, सदर बांधकाम सरपंच शालू इंदूरकर यांच्या घराजवळून होत आहे. मात्र कोणत्याही पदाधिकाऱ्यांचे सदर नालीच्या बांधकामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. नालीचे बांधकाम करताना रद्दा मिश्रीत दीड इंच गिट्टीचा वापर केला जात आहे. नालीच्या बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर केला जात असल्याची बाब नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामविकास अधिकारी डाखरे यांच्या निदर्शनास सदर बाब आणून दिली. परंतु डाखरे यांनीही दुर्लक्ष केले, असा आरोप वार्डातील नागरिकांनी केला आहे. त्यानंतर वार्डातील नागरिकांनी संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करून नालीच्या बांधकामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. परंतु याकडे ग्रा.पं. प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नाली बांधकामाची चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करावी, अशी मागणी लोजपाचे जिल्हाध्यक्ष मुर्लीधर भानारकर यांनी केली आहे. या संदर्भात आरमोरीचे ग्रामविकास अधिकारी एन.एम. डाखरे यांना विचारणा केली असता, त्यांनी मी आज सुटीवर आहे. त्यामुळे या संदर्भात निश्चित माहिती देता येणार नाही. ३० आॅगस्टला या संदर्भात सांगता येईल, असे ते म्हणाले.(वार्ताहर