शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

हमीभाव रबी धान खरेदीसाठी शासनाचे वरातीमागून घाेडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2022 05:00 IST

खरीप हंगामातील खरेदीची सुरुवात १ ऑक्टाेबर तर रब्बी हंगामातील धानाची खरेदी १ मेपासून हाेणे गरजेचे असते. दरवर्षी जीआरनुसार यात मागेपुढे हाेऊ शकते; परंतु हा कालावधी निश्चित असताे. यावर्षी १ मेपासून धानाची खरेदी सुरू हाेणार हाेती; परंतु केंद्र सुरू हाेण्यास दिरंगाई झाल्याने तसेच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार धान खरेदीचे जिल्ह्याचे उद्दिष्ट व प्रतीएकर धान खरेदीची मर्यादा याचा तिढा कायम हाेता. त्यामुळे ३१ जूनपर्यंत धान खरेदीची अवधी वाढविली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : शासनाच्या आधारभूत धान खरेदी याेजनेंतर्गत रब्बी हंगामातील धानासाठी १ मे पासून हमीभाव खरेदी केंद्र सुरू हाेणे आवश्यक हाेते. परंतु यात बरीच दिरंगाई झाली. परिणामी मे महिन्यात ज्या शेतकऱ्यांचे धान पीक निघाले, अशा शेतकऱ्यांनी गरजेपाेटी लगेच धानाची विक्री खासगी व्यापाऱ्यांना केली. धान विक्री झाल्यानंतर आधारभूत खरेदी केंद्र सुरू झाल्याने ‘वरातीमागून घाेडे’ असाच काहीसा प्रकार शासनाचा झाला तर नाही ना, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.गडचिराेली जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळांतर्गत हमीभाव खरेदी केंद्रांवर खरीप व रब्बी हंगामातील धानाची खरेदी केली जाते. खरीप हंगामातील खरेदीची सुरुवात १ ऑक्टाेबर तर रब्बी हंगामातील धानाची खरेदी १ मेपासून हाेणे गरजेचे असते. दरवर्षी जीआरनुसार यात मागेपुढे हाेऊ शकते; परंतु हा कालावधी निश्चित असताे. यावर्षी १ मेपासून धानाची खरेदी सुरू हाेणार हाेती; परंतु केंद्र सुरू हाेण्यास दिरंगाई झाल्याने तसेच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार धान खरेदीचे जिल्ह्याचे उद्दिष्ट व प्रतीएकर धान खरेदीची मर्यादा याचा तिढा कायम हाेता. त्यामुळे ३१ जूनपर्यंत धान खरेदीची अवधी वाढविली आहे.

उतारा जास्त तरी मर्यादा कमीरब्बीत लागवड केलेल्या धानाचे पीक उन्हाळ्यात कापणी व मळणीला येते. तीव्र प्रकाशामुळे  पिकावर राेगांचा प्रादुर्भाव हाेत नाही. त्यामुळे खरीप हंगामापेक्षा उन्हाळी पिकाचा उतारा जास्त असतो. तरीही जिल्ह्याला यंदा एकरी केवळ ८.२४ क्विंटलची मर्यादा आहे. तर १.७५ लाख क्विंटलचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. एकरी मर्यादा व उद्दिष्ट अत्यल्प असून अनेक शेतकऱ्यांना आपल्याकडील धान खासगी व्यापाऱ्यांनाच विकल्याशिवाय पर्याय नाही.

पावसाळ्यात शेतकरी धान विकणार?-    जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माेसमी वारे धडकणार, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. याच कालावधीत शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त राहणार आहेत. अशावेळी ते धानविक्रीसाठी हमीभाव केंद्रांवर जातील की, शेतीची कामे करतील, असा प्रश्न आहे. धान खरेदी केंद्रावर जाऊनही त्याच दिवशी काम हाेईल, याची शाश्वती नसते.

आविमची २८ केंद्रे-    आदिवासी विकास महामंडळांतर्गत गडचिराेली विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणारी एकूण २८ केंद्रे सध्या सुरू झाली आहेत. मात्र, येथे प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली नाही. शेतकरी धान विक्रीसाठी आणत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मार्केटिंग फेडरेशनचे केंद्र तर सुरूच झाले नाही.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डgovernment schemeसरकारी योजना