शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

सरकार करत आहे दडपशाहीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:14 AM

विद्यमान सत्ताधाऱ्यांनी खोटा प्रचार करून देशातील जनतेला मूर्ख बनविले. लोकशाहीच्या मार्गाने निवडणुकांना सामोरे जाण्याऐवजी दंडूकेशाहीचा वापर करून ईव्हीएम घोटाळ्याच्या माध्यमातून देशात सत्ता हस्तगत केली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नावावर शेतकऱ्यांना मुर्ख बनविले. गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी बांधवांचे आरक्षण पूर्ववत केले नाही.

ठळक मुद्देनाना पटोले यांचा आरोप : देसाईगंजात महापर्दाफाश सभा

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : सध्या देशात गल्ली ते दिल्लीपर्यंत विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करत अनेक चौकशा लावल्या जात आहे. स्वत: केलेले पाप लपविण्यासाठीच सरकारकडून दडपशाहीचा वापर करून विरोधकांना खिळखिळे करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख, माजी खा.नाना पटोले यांनी केला. या फेकू सरकारची सत्ता उलथवून लावणारच, असा विश्वासही त्यांनी येथील जाहीर सभेत व्यक्त केला.देसाईगंज येथील लाखांदूर मार्गावरच्या सभागृहात बुधवारी काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित महापर्दाफाश सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, माजी आ.आनंदराव गेडाम, प्रदेश पदाधिकारी रवींद्र दरेकर, माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, अ‍ॅड.संजय गुरू, जीवन नाट, प्रभाकर तुलावी, भागवत नाकाडे, शीला पटले, मनीषा दोनाडकर, अ‍ॅड.गोविंद भेंडारकर, नगरसेवक आरिफ खानानी आदी आजी-माजी पदाधिकारी मंचावर विराजमान होते.पुढे बोलताना पटोले म्हणाले, विद्यमान सत्ताधाऱ्यांनी खोटा प्रचार करून देशातील जनतेला मूर्ख बनविले. लोकशाहीच्या मार्गाने निवडणुकांना सामोरे जाण्याऐवजी दंडूकेशाहीचा वापर करून ईव्हीएम घोटाळ्याच्या माध्यमातून देशात सत्ता हस्तगत केली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नावावर शेतकऱ्यांना मुर्ख बनविले. गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी बांधवांचे आरक्षण पूर्ववत केले नाही. ओबीसींना त्यांच्या घटनादत्त अधिकारांपासून वंचित ठेवण्याचे पाप भाजपच्या सरकारने केले आहे, असा आरोप पटोले यांनी केला. ज्या संविधानाच्या भरवशावर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्याच संविधानाला जाळण्याचे पाप या सरकारच्या काळात होऊनसुद्धा यातील आरोपी मोकाट आहेत, असा ठपका पटोले यांनी ठेवला. काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास सूरजागड लोहप्रकल्प मार्गी लावून लगतच्या चारही जिल्ह्यातील बेरोजगारांना काम देणार, तसेच शेती सुजलाम सुफलाम केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार पटोले यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक अ‍ॅड.संजय गुरू, संचालन परसराम टिकले यांनी तर आभार भूषण अलामे यांनी मानले. सभेला कोरची, कुरखेडा, देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन बिघडलेकाँग्रेसच्या महापर्दाफाश सभा देसाईगंज आणि गडचिरोली येथे आयोजित केल्या होत्या. देसाईगंज येथील सभा दुपारी ३ वाजता तर गडचिरोली येथील सभा सायंकाळी ६ वाजता होणार असल्याचे पदाधिकाºयांनी जाहीर केले होते. परंतु गोंदिया जिल्ह्यातील सभांना उशीर झाल्यामुळे काँग्रेस नेते नाना पटोले सायंकाळी ६ वाजता देसाईगंजमध्ये पोहोचले. गडचिरोलीतील सभा ही उशिराने सुरू झाली. विशेष म्हणजे जिल्हा काँग्रेस कमिटीने काढलेल्या निमंत्रणात देसाईगंज येथील कार्यक्रमाचा उल्लेखही नव्हता. त्यामुळे काँग्रेसमधील गटबाजी आणि शह-काटशहचे राजकारण सुरूच असल्याचे दिसून आले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस