महिला काँग्रेसतर्फे शासनाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 00:32 IST2018-09-10T00:31:55+5:302018-09-10T00:32:45+5:30
गॅस, पेट्रोल, डिझेच्या किमती दररोज वाढत आहेत. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या जनविरोधी धोरणामुळे जनता त्रस्त आहेत, असा आरोप करून जिल्हा महिला काँग्रेस कमिटीने शनिवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात आंदोलन करून गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध केला.

महिला काँग्रेसतर्फे शासनाचा निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गॅस, पेट्रोल, डिझेच्या किमती दररोज वाढत आहेत. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या जनविरोधी धोरणामुळे जनता त्रस्त आहेत, असा आरोप करून जिल्हा महिला काँग्रेस कमिटीने शनिवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात आंदोलन करून गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध केला. याप्रसंगी महिलांनी ‘सरकार हटाओ, देश बचाओ, जीवघेणी महागाई थांबली पाहिजे’ यासह विविध घोषणा दिल्या.
गॅस, पेट्रोल, डिझेलची दरवाढ दिवसेंदिवस होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला महागाईचा फटका बसत आहे. परंतु याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे यांनी केला. याप्रसंगी डॉ. चंदा कोडवते, पौर्णिमा भडके, कल्पा नंदेश्वर, दीपा माळवणकर, आशा मेश्राम, मंजू आत्राम, सपना गलगट, वर्ष कुलदेवकर, सुवर्णा उराडे, निळा निंदेकर, निर्मला गुरनुले, पुष्पा बाळेकरमकर, सुलोचना गेडाम, बोरकर, आरती कंगाले, निशा गेडाम, कुणाल पेंदोरकर, आरिफ कानोजे, पंकज बारसिंगे, तुषार मडावी, नुगेश शिडाम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.