शेतीसाठी ‘अच्छे दिन’

By Admin | Updated: July 1, 2014 01:29 IST2014-07-01T01:29:10+5:302014-07-01T01:29:10+5:30

पूर्व विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य पीक म्हणजे धान. मात्र गेल्या काही वर्षांत गडचिरोलीच्या पीक पॅटर्नमध्ये कमालीचे बदल झाले असून याचा परिणाम जिल्ह्याचे कृषी उत्पादन वाढण्यावर झाला आहे.

'Good days' for agriculture | शेतीसाठी ‘अच्छे दिन’

शेतीसाठी ‘अच्छे दिन’

दिन विशेष : जिल्ह्याच्या कृषी उत्पादनात प्रचंड वाढ
गडचिरोली : पूर्व विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य पीक म्हणजे धान. मात्र गेल्या काही वर्षांत गडचिरोलीच्या पीक पॅटर्नमध्ये कमालीचे बदल झाले असून याचा परिणाम जिल्ह्याचे कृषी उत्पादन वाढण्यावर झाला आहे. ही कृषी विकासाच्या क्षेत्रातील अग्रगण्य क्रांतीच असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
२०१३-१४ या वर्षात जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रात पीक पध्दतीत बदल झाले आहे. खरीप हंगामात कापसाचे क्षेत्र ५ हजार २८३ हेक्टरने वाढले आहे. पूर्वी ५ हजार हेक्टर क्षेत्र होते आता ते १० हजार २८३ हेक्टरवर गेले आहे. खरीप व रब्बी हंगामात मका संकरीत वाणाचे क्षेत्र २७९९ हेक्टर होते. लाखोळी क्षेत्रातही लक्षणीय वाढ झाली असून हे क्षेत्र ७ हजार १५६ हेक्टर झाले आहे. भाजीपाला क्षेत्रही २ हजार २८६ हेक्टर झाले आहे. हळद पिकाची लागवड ५६ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. ही गडचिरोली जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रातील विकासाची नांदी आहे. दुबार पिकाखालील क्षेत्रही ११ हजार ६ हेक्टरने वाढले आहे. पूर्वी हे क्षेत्र २४ हजार ७५२ हेक्टर होते आता ते ३५ हजार ७५८ झाले आहेत तर उन्हाळी पिकाखालील क्षेत्रही ३ हजार ८७ हेक्टरने वाढले असून २ हजार २१ वरून ५ हजार १०८ वर गेले आहे.
भाताखालील क्षेत्रामध्येही १४ हजार हेक्टरची वाढ होऊन संकरीत भाताचे क्षेत्र २ हजार ४०० हेक्टरवर आले आहे. भाताचे उत्पादकताही हेक्टरी ३९० किलोने वाढली आहे. पूर्वी १ हजार १४४ किलो हेक्टर असलेली उत्पादकता आता १ हजार ५३२ किलो हेक्टर झाली आहे.
जिल्ह्यातील एकूण भात उत्पादनातही ८० हजार ८०० मॅट्रीक टनाची वाढ झाली आहे. उत्पादकता आता २ लाख ५५ हजार ८०० मेट्रीक टन इतकी झाली आहे.
वाढीव उत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना १०१ कोटी रूपयाचा लाभ झालेला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 'Good days' for agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.