शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
2
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
4
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
6
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
7
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
8
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
9
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
10
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
11
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
12
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
13
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
14
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
15
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
16
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
17
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
18
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
19
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
20
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
Daily Top 2Weekly Top 5

सोने ७४ तर चांदी ८७ हजारांवर; दिवाळीत आणखी भाव वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 15:49 IST

तेजी-मंदी कायम : मागणी-पुरवठ्यातील असंतुलनाचा परिणाम

विलास चिलबुले लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : मागील दोन वर्षांपासून सोने व चांदी खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सोने व चांदीच्या भावातसुद्धा बाजारामध्ये चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याचे भाव ७४ हजार ३०० रुपये प्रतितोळे, तर चांदीचे भाव ८७ हजार रुपये प्रतिकिलो आहेत. येत्या काही महिन्यांत सण, उत्सव, लग्न पाहता सोने-चांदीचे दर आणखी वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज सराफा बाजारपेठेत व्यक्त केला जात आहे.

मधल्या काळात सोने आणि चांदीच्या भावात तेजी-मंदी होती; परंतु आता पुन्हा सोन्याचे भाव वधारले आहेत. विवाहानंतर सोने आणि चांदीची खरेदी खास करून दिवाळीमध्ये केली जाते. त्यामुळे दिवाळीपर्यंत सोने आणि चांदीच्या भावात आणखी वाढ होऊ शकतो.

बुकिंग फायद्याचे लग्नप्रसंगासाठी गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकाकडून सोन्याचे दागिने कमी- अधिक प्रमाणात का होईना खरेदी केले जातात. लग्न समारंभ असतो, ते दिवाळीआधीच सोने-चांदीच्या दागिन्यांचे बुकिंग करतात.

मागणी वाढल्यास पुन्हा वाढू शकतो भाव अर्थशास्त्राच्या नियमानुसार एखाद्या वस्तूची मागणी वाढल्यास भाव वाढतो. त्यामुळे दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या लग्नसराईमुळे सोने आणि चांदीच्या मागणीत वाढ होईल. परिणामी, किमतीतही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सोने-चांदीचे भाव काय?महिना                         सोने (प्रति तोळा)               चांदी (प्रति किलो)१ जून                             ७२५००                                   ८५०००१५ जून                           ७१७००                                   ८५९००१ जुलै                             ७१७५०                                   ८४७००१५ जुलै                           ७३०००                                   ८३८०० १ ऑगस्ट                         ७१३५०                                   ८७१००१५ ऑगस्ट                       ७२७००                                   ८६२००२६ ऑगस्ट                       ७४३००                                   ८७०००

"दिवाळीमध्ये ग्राहकांकडून सोने आणि चांदीची खरेदी केली जाते. त्यामुळे भाव तेजीत असतो. त्यामुळे दिवाळीपर्यंत आणखी भाव वाढण्याची शक्यता आहे." - अक्षय बेहरे, सराफा व्यावसायिक, आरमोरी.

"सोने-चांदीच्या दरात चढउतार ही नित्याचीच बाब असली तरी मागील दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात दर वाढले. त्यामुळे सोने घेणे सर्वसामान्यांना अवघडच झाले आहे." - पंकज खरवडे, सराफा व्यावसायिक, आरमोरी.

  

टॅग्स :GoldसोनंGadchiroliगडचिरोली