शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी पुलावरील वाहतूक राहणार बंद

By admin | Updated: March 6, 2017 00:38 IST

महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्याला जोडणाऱ्या सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवर पूल बांधण्यात आला.

आजपासून तीन दिवस : वाहनाची स्पॅन लोड टेस्टिंग होणारसिरोंचा : महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्याला जोडणाऱ्या सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवर पूल बांधण्यात आला. या पुलाचे उद्घाटन महिनाभरापूर्वी राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र अद्यापही या पुलावर वाहनांचे लोड टेस्टिंग करण्यात येत नव्हते. परिणामी या पुलावरून दररोज शेकडो ओव्हरलोड ट्रकांची वाहतूक सुरू होती. लोड टेस्टिंगची मागणी जोर धरू लागल्याने आता सोमवारपासून या पुलावर स्पॅन लोड टेस्टिंगचे काम होणार आहे. परिणामी तीन दिवस या पुलावरील वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. ६ ते ८ मार्च या कालावधीत तीन दिवस गोदावरी पुलावरील वाहनांची लोड टेस्टिंग करण्यात येणार आहे. ८ मार्चला सायंकाळी ५ वाजेपर्यंत सदर पुलावरून वाहतूक बंद राहिल. तपासणी मोहिमेदरम्यान मोठे व लहान वाहनांच्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात येणार आहे. या कार्यवाही संदर्भात उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग सिरोंचा यांनी तहसीलदारांना पत्र दिले आहे.हैदराबादवरून येईल चमूगोदावरी नदीच्या पुलावरील लोड टेस्टिंगसाठी तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथून विशेष टीम येणार आहे. सदर माहिती विशेष प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल मेश्राम व शाखा अभियंता एजाज सय्यद यांनी दिली आहे. लोड टेस्टिंगदरम्यान तेलंगणा व महाराष्ट्र दोन्ही राज्यातील पुलाच्या काठावर बॅरीकेट लावण्यात येणार असून येथे तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.