स्वतंत्र विदर्भ राज्य त्वरित द्या

By Admin | Updated: July 1, 2014 23:29 IST2014-07-01T23:29:59+5:302014-07-01T23:29:59+5:30

विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा शाखा गडचिरोलीच्यावतीने वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान व गृहमंत्री यांना आज

Give a separate Vidarbha state immediately | स्वतंत्र विदर्भ राज्य त्वरित द्या

स्वतंत्र विदर्भ राज्य त्वरित द्या

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : विदर्भ राज्य आंदोलन समिती आक्रमक
गडचिरोली : विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा शाखा गडचिरोलीच्यावतीने वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान व गृहमंत्री यांना आज मंगळवारी निवेदन पाठविण्यात आले.
निवेदन सादर केल्यानंतर विश्रामगृह गडचिरोली येथे विदर्भवादी कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत १० जुलैपर्यंत जिल्हा कार्यकारीणी, तालुका कार्यकारीणी व गडचिरोली शहर व वडसा शहर कार्यकारीणी तयार करून आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. बैठकीमध्ये केंद्र शासनाने विदर्भ राज्याची मागणी तत्काळ मंजूर करून वेगळे विदर्भ राज्य निर्माण करावे, असा ठराव घेण्यात आला. अन्यथा गडचिरोली मागास जिल्ह्यातून आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा निर्धार विदर्भवादी नेते व कार्यकर्त्यांनी केला.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना नामदेव गडपल्लीवार, राजेंद्रसिंह ठाकूर, रमेश भुरसे, रोहिदास राऊत, सुरेश पद्मशाली, विलास कोडाप, चंद्रशेखर भडांगे, विजय शेडमाके, सुधाकर नाईक, प्रभाकर बारापात्रे, आर. एन. कोडाप, रामचंद्र रोकडे, चिंतामन सहारे, रामन्ना बोनकुलवार, प्रा. अशोक लांजेवार, रमेश उप्पलवार, योगेश गोहणे, विवेक चडगुलवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Give a separate Vidarbha state immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.