मुस्लिमांना जात प्रमाणपत्र द्या
By Admin | Updated: August 12, 2014 23:45 IST2014-08-12T23:45:45+5:302014-08-12T23:45:45+5:30
नुकतेच महाराष्ट्र शासनाने आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्याप्रमाणे महाराष्ट्रात मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण जाहीर केले आहे. या धरतीवर मुस्लीम समाज बांधवांना तत्काळ जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे,

मुस्लिमांना जात प्रमाणपत्र द्या
अडचणी मांडल्या : मुस्लीम समाजाचे तहसीलदारांना निवेदन
सिरोंचा : नुकतेच महाराष्ट्र शासनाने आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्याप्रमाणे महाराष्ट्रात मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण जाहीर केले आहे. या धरतीवर मुस्लीम समाज बांधवांना तत्काळ जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने सिरोंचाच्या तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने म्हटले आहे की, राज्य शासनाने मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण दिल्यामुळे जातीचे प्रमाणपत्र देण्यात कोणतीही अडचण नाही. त्यामुळे मुस्लिमांना तत्काळ जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने यावेळी केली. जात प्रमाणपत्राअभावी अनेक शासकीय कामात अडथळा निर्माण होत आहे. तसेच जात प्रमाणपत्र अभावी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचण येत आहे, असे सांगितले. यावेळी सय्यद सलाम, अब्दुल सादीक, इरफान खान, जाकीर अली, हुसेन खान, इरफान शेख, आसिफ खान, बशारत अली, मो. याकुब बाबा, ईस्माईल शेख आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)