शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण विभागाच्या मंजुरीविनाच रेती उत्खननाच्या लिलावाचा घाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 15:33 IST

कंत्राटदार वेठीस : दोन कोटी रुपयांची अनामतही धरली रोखून

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात जुलै उजाडल्यानंतरही यंदा रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया पूर्णत्वास गेली नाही. पर्यावरण विभागाचा ग्रीन सिग्नल येण्यापूर्वीच निविदा मागविण्यात आल्या. यात आठ ते दहा कंत्राटदारांचे तब्बल दोन कोटी रुपये अनामत म्हणून जमा आहेत, पण ते प्रशासनाने रोखून धरले आहेत. त्यामुळे कंत्राटदारांची अक्षरशः कोंडी झाली आहे. दुसरीकडे अधिकृत रेती घाट सुरु नसल्याने माफियांना मात्र अच्छे दिन आले असून ते ठिकठिकाणी नदीपात्र पोखरण्याचे काम राजरोस सुरू आहे.

नद्यांचा जिल्हा अशी ओळख असतानाही जिल्ह्यात सध्या रेती मिळणे कठीण आहे. छुप्या पद्धतीने रेती मिळविण्यासाठी सामान्यांना माफियांच्या घराचा उंबरठा झिजवावा लागत आहे. एका ब्राससाठी तब्बल पाच ते सहा हजार रुपये मोजावे लागत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या आडमुठ्या कारभारामुळे ही स्थिती ओढावल्याचे चित्र आहे. पर्यावरण विभागाच्या मंजुरी नसताना प्रशासनाने रेती घाटासाठी लिलावप्रक्रिया हाती घेतली. कंत्राटदारांनी अनामत रक्कम भरली. सुमारे दोन कोटींहून अधिकची रक्कम अनाम म्हणून सध्या जमा आहे. मात्र, पर्यावरण विभागाच्या मंजुरीअभावी लिलाव होऊ न शकल्याने कंत्राटदारांची आर्थिक कोंडी झाली आहे. पर्यावरण विभागाची मंजुरीच नव्हती तर रेती उत्खननाच्या लिलावाचा घाट कशासाठी घातला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शासकीय बांधकामाला रेती येते कोठून?● एकीकडे रेती घाटांचे लिलाव परवानग्यांच्या कचाट्यात अडकली आहेत. दुसरीकडे पावसाळा सुरू होऊन महिना लोटला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध विकासकामांतर्गत बांधकामे जोमाने सुरू आहेत.● अशा स्थितीत या बांधकामांना रेती येते तरी कोठून, हादेखील संशोधनाचा विषय आहे. सामान्यांना कायद्याचा धाक दाखविणाऱ्या प्रशासनाच्याच दिव्याखाली अंधार असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

लिलावप्रक्रियेला विलंब करुन माफियांच्या हिताचे धोरण राबविणारे प्रशासनातील पाठीराखे कोण, अशी चर्चा होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिसाद नाही, अपर जिल्हाधिकारी म्हणाले माहिती घेतो...जिल्हाधिकारी संजय देंने यांना संपर्क केला असता त्यांनी कॉल घेतला नाही. मेसेजलाही त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. प्रभारी अपर जिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके म्हणाले, मी नुकताच पदभार घेतला आहे. पर्यावरणाची मंजुरी का रखडली याची माहिती घेऊन कळवतो. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लवकर लिलाव प्रक्रिया राबविण्यासाठी प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

रेती माफियांना कोण पोसतयं ?लिलाव प्रक्रियेला होत असलेला विलंब, कंत्राटदारांसाठी अडथळ्यांची शर्यत अन् दुसरीकडे माफियांना रान मोकळे असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे रेती माफियांना नेमकं कोण पोसतयं? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

टॅग्स :sandवाळूmafiaमाफियाGadchiroliगडचिरोली