जेनेरीक औषधी सर्वांसाठी लाभदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 06:00 IST2020-03-08T06:00:00+5:302020-03-08T06:00:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जेनेरीक औषधी दर्जेदार असून ती स्वस्त दरात उपलब्ध होते. त्यामुळे नागरिकांनी या औषधीचा लाभ ...

जेनेरीक औषधी सर्वांसाठी लाभदायक
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जेनेरीक औषधी दर्जेदार असून ती स्वस्त दरात उपलब्ध होते. त्यामुळे नागरिकांनी या औषधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले. प्रधानमंत्री जनऔषधी परियोजनेंतर्गत ७ मार्च रोजी जेनेरीक औषधी दिनाचे आयोजन चामोर्शी मार्गावर केले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. अशोक नेते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल रूडे, भाजपाचे जिल्हा महामंत्री डॉ. भारत खटी, दलित अघाडीचे जिल्हाध्यक्ष डी. के. मेश्राम, औषध प्रशासन विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त एन.व्ही. लोहकरे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, महेंद्र बुरे, राकेश राचमलवार, मार्र्कंडी आवारी, एम. डी. चलाख, देवराव भांडेकर, प्रसाद खरवडे आदी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट प्रक्षेपणाद्वारे जेनेरीक औषधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. जेनेरीक औषधी ३० ते ९० टक्के स्वस्त दरात उपलब्ध होते. या औषधीचे गुण सामान्य औषधीप्रमाणेच आहेत. त्यामुळे गरीब नागरिकांनी या औषधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. डॉ.अनिल रूडे यांनीही मार्गदर्शन केले.