विद्यार्थी आणि शिक्षकांविनाच साजरी होणार गांधी जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 10:47 PM2018-10-01T22:47:50+5:302018-10-01T22:48:06+5:30

राज्य शासनाने यावर्षी महात्मा गांधींची १५० वी जयंती २ आॅक्टोबर रोजी प्रत्येक शाळेत साजरी करण्यासोबतच पुढील २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत विविध कार्यक्रम, स्पर्धा घेण्याचे परिपत्रक काढले. मात्र गांधी जयंतीच्या सुटीमुळे केवळ बापूंच्या फोटोचे पूजन करण्यासाठी ग्रामीण भागातील अनेक शाळा उघडल्याच जाणार नाही. त्यामुळे गांधी जयंतीला शाळा-महाविद्यालयांपासून तर शासकीय कार्यालयांना सुटी देण्याचे औचित्य काय? असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Gandhi Jayanti to be celebrated without students and teachers | विद्यार्थी आणि शिक्षकांविनाच साजरी होणार गांधी जयंती

विद्यार्थी आणि शिक्षकांविनाच साजरी होणार गांधी जयंती

Next
ठळक मुद्देसुटीचा परिणाम : शासनाचे परिपत्रक ठरणार कुचकामी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्य शासनाने यावर्षी महात्मा गांधींची १५० वी जयंती २ आॅक्टोबर रोजी प्रत्येक शाळेत साजरी करण्यासोबतच पुढील २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत विविध कार्यक्रम, स्पर्धा घेण्याचे परिपत्रक काढले. मात्र गांधी जयंतीच्या सुटीमुळे केवळ बापूंच्या फोटोचे पूजन करण्यासाठी ग्रामीण भागातील अनेक शाळा उघडल्याच जाणार नाही. त्यामुळे गांधी जयंतीला शाळा-महाविद्यालयांपासून तर शासकीय कार्यालयांना सुटी देण्याचे औचित्य काय? असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
अहिंसात्मक स्वातंत्र्य लढा देऊन देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या बापूंना त्यांच्या जयंतीनिमित्त (२ आॅक्टोबर) अभिवादन करण्यासाठी शासनाकडून दरवर्षीच शासकीय सुटी पाळली जाते. पण बापूंच्या प्रतिमेसमोर अभिवादन करण्यासाठी मोजके अधिकारी-कर्मचारी सोडले तर कोणीही आपापल्या कार्यालयाकडे फिरकत नाही. हीच स्थिती बहुतांश शाळा-महाविद्यालयांची आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात तर बहुतांश शाळा शिक्षकांच्या मनमर्जीने सुरू असतात आणि मर्जीनेच बंद असतात. त्यात २ आॅक्टोबरची हक्काची सुटी असताना जवळच्या तालुका किंवा जिल्हा मुख्यालयातून अप-डाऊन करणारे शिक्षक केवळ बापूंना अभिवादन करण्यासाठी शाळांकडे फिरकतच नाही.
यावर्षी २० आॅगस्ट रोजी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढलेल्या परिपत्रकात २ आॅक्टोबर रोजी विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीचे आयोजन करावे, तसेच गांधी वंदना घेऊन गांधीजींच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करावा असे कार्यक्रमाचे स्वरूप दिले आहे.
याशिवाय पुढील वर्षभरात गांधीजींची असहकार चळवळ, सविनय कायदेभिंग आंदोलन, भारत छोडो आंदोलन यावर निबंध स्पर्धा, विज्ञान जत्रा व प्रदर्शन, गांधी विचारांवर आधारित चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, गांधीवादी विचारवंतांची व्याख्याने असे विविध कार्यक्रम राबविण्याचे सूचित केले आहे.
वर्षभर हे कार्यक्रम होतीलही, पण २ आॅक्टोबरला केवळ प्रभातफेरीसाठी विद्यार्थीच काय, शिक्षकही शाळेत येणार नाही अशी स्थिती गडचिरोलीच्या दुर्गम तसेच ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी पहायला मिळणार आहे.

Web Title: Gandhi Jayanti to be celebrated without students and teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.