शहिदांना गडचिरोली पोलिसांतर्फे मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 21:47 IST2018-10-21T21:46:31+5:302018-10-21T21:47:10+5:30
आपले कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी व जवानांना गडचिरोली पोलिसांतर्फे रविवारी आदरांजली अर्पण करण्यात आली.

शहिदांना गडचिरोली पोलिसांतर्फे मानवंदना
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आपले कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी व जवानांना गडचिरोली पोलिसांतर्फे रविवारी आदरांजली अर्पण करण्यात आली.
राष्ट्रीय पोलीस शहीद दिनानिमित्त स्थानिक पोलीस मुख्यालयात रविवारी सकाळी ८ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहीद स्मृती स्तंभासमोर एकाचवेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. धारार्थी पडलेल्या प्रत्येक हुतात्म्याचे नावाचे स्मरण करून त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी अशोक चौधरी, अपर पोलीस अधीक्षक हरी बालाजी, महेंद्र पंडित, मोहितकुमार गर्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी समिरसिंह साळवे, प्रदीप चौगावकर यांच्यासह जिल्ह्यातील शहीद पोलिसांचे कुटुंब उपस्थित होते.
यावेळी हवेत तीन फेºया झाडून शहीदविरांना मानवंदना देण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राखी पोलीस निरीक्षक ठाकूर, पोलीस कल्याण शाखेचे नरेंद्र पवार यांच्यासह पोलीस जवानांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस शहीद दिनाच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
जिल्हा निर्मितीपासून ४१९ जवान शहीद
नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्ह्यात सन १९८२ पासून आतापर्यंत एकूण ४१९ पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. प्रत्येक शहीद जवानांचे वाचन उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे, प्रभारी पोलीस उपअधीक्षक प्रदीप चौगावकर यांनी केले. कार्यक्रमादरम्यान पोलीस अधिकाºयांनी शहिदांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचे आश्वासन दिले.