शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत चार लक्ष लिटर क्षमतेचा नवा जलकुंभ होणार

By admin | Updated: June 26, 2016 01:13 IST

गडचिरोली शहरातील अपुऱ्या पाणी पुरवठ्याची समस्या मार्गी काढण्याच्या दृष्टीने जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ४ लक्ष लिटर क्षमता

जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी : एक कोटी नऊ लाखांचा निधी प्राप्त; अपुऱ्या पाणी पुरवठ्याची समस्या मार्गी लागणारगडचिरोली : गडचिरोली शहरातील अपुऱ्या पाणी पुरवठ्याची समस्या मार्गी काढण्याच्या दृष्टीने जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ४ लक्ष लिटर क्षमता असलेल्या १ कोटी ३८ लाख रूपये किमतीच्या नव्या जलकुंभाचे काम जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केले आहे. यापैकी गडचिरोली पालिकेला १ कोटी ९ लाख ९७ हजार ४० रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. सदर काम मार्गी लावण्याच्या दृष्टीने पालिकेच्या वतीने तांत्रिक मान्यतेची कार्यवाही गतीने सुरू झाली आहे.स्थानिक नगर पालिका प्रशासनाच्या वतीने वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटावर नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. पालिकेच्या वतीने शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सात जलकुंभ उभारण्यात आले आहे. मात्र या जलकुंभातील पाणी वाढत्या लोकसंख्येला कमी पडत आहे. शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील हनुमान वार्ड, सुभाष वार्ड व नेहरू वार्ड हा भाग चढ असल्याने येथे नळाचे पाणी पुरेशा प्रमाणात येत नाही. दरवर्षीच्या उन्हाळ्यात या प्रभागातील नागरिकांना सात ते आठ फूट खोल खड्ड्यातून बकेट टाकून पाणी काढावे लागते. उन्हाळ्यात भिषण पाणी टंचाई जाणवत असल्याने प्रभाग क्रमांक तीन मधील नागरिकांची प्रचंड पंचाईत होत होती. त्यामुळे प्रभाग क्रमांक तीन व उर्वरित शहरात पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा करण्यासाठी नवे जलकुंभ मंजूर करण्यात यावे, अशी मागणी या प्रभागातील नागरिकांनी नगर पालिका प्रशासनाकडे केली होती. प्रभाग क्रमांक ३ मधील नगर सेवक तथा माजी बांधकाम सभापती आनंद श्रुंगारपवार, नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक तसेच नगरसेवक अजय भांडेकर यांनी सदर प्रश्न पालिकेच्या सर्वसाधारण सभेत लावून धरला. त्यानंतर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत या जलकुंभाचा ठराव घेण्यात आला. न.प. प्रशासनाच्या वतीने सदर जलकुंभाच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करून त्याला मंजुरी प्रदान करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी या जलकुंभाचे काम जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर केले. (स्थानिक प्रतिनिधी)