गडचिरोलीत दोन कोरोना बाधितांच्या मृत्यूसह ११८ नवीन बाधित, तर १३७ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 18:48 IST2020-10-29T18:47:42+5:302020-10-29T18:48:02+5:30
Gadchiroli News Corona कोरोनामुळे दोन मृत्यूसह जिल्हयात 118 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 137 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.

गडचिरोलीत दोन कोरोना बाधितांच्या मृत्यूसह ११८ नवीन बाधित, तर १३७ कोरोनामुक्त
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: कोरोनामुळे दोन मृत्यूसह जिल्हयात 118 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 137 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 5651 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 4709 वर पोहचली.
आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 57 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन मृत्यूमध्ये नवेगाव कॉम्पलेक्स, गडचिरोली येथील 84 वर्षीय महिला हायपरटेंशनची रुग्ण असून दुसरी 70 वर्षीय महिला व्याहड सावली येथील असून ती सुद्धा हायपरटेंशन आजाराने ग्रस्त होती. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.33 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 15.66 टक्के तर मृत्यू दर 1.01 टक्के झाला.
नवीन 118 बाधितांमध्ये गडचिरोली 46, अहेरी 10, आरमोरी 4, भामरागड 23, चामोर्शी 6, धानोरा 4, एटापल्ली 3, कोरची 0, कुरखेडा 3, मुलचेरा 2, सिरोंचा 4 व वडसा येथील 5 जणाचा समावेश आहे.
आज कोरोनामुक्त झालेल्या 137 रूग्णांमध्ये गडचिरोली 51, अहेरी 28, आरमोरी 5, भामरागड 3, चामोर्शी 17, धानोरा 2, एटापल्ली 2, मुलचेरा 9, सिरोंचा 2, कोरची 7, कुरखेडा 7 व वडसा मधील 4 जणांचा समावेश आहे.