गडचिरोली शहरात शांतता क्षेत्रच नाही; गोंगाट करणाऱ्यांवर कारवाई करणार कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 16:15 IST2025-02-27T16:14:40+5:302025-02-27T16:15:52+5:30
विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग : आरोग्यावरही होतो परिणाम

Gadchiroli town is not just in a peace zone; Who will take action against the noisemakers?
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वाहनांचा कर्कश आवाज, उद्योग, प्रकल्प, मिल्स, ध्वनीक्षेपकांचा आवाज आदींमुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदूषण होते. या प्रदूषणापासून सुटका व्हावी, निवांत वेळ घालवता यावा, यासाठी मोठ्या शहरांमध्ये शांतता क्षेत्र असते. परंतु गडचिरोली शहरात शांतता क्षेत्रच नाही. त्यामुळे जोरजोरातील आवाजावर कोणाचेही नियंत्रण नाही.
गडचिरोली शहरात गत दोन वर्षात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. याशिवाय शहरात अनेक उद्योग वाढल्याने त्याद्वारे ध्वनीप्रदूषणात भर पडली. दिवसभर राष्ट्रीय महामार्गाने वाहनांची वर्दळ असते. याशिवाय वाहनांच्या कर्कश आवाजामुळे ध्वनीप्रदूषण वाढते. या प्रदूषणापासून सुटका मिळावी, निवांत विश्रांती घेता यावी, यासाठी शहरात शांतता क्षेत्र असणे गरजेचे आहे. परंतु शहरात हे क्षेत्र नसल्याने नागरिकांना कर्णकर्कश आवाजापासून सुटका करून घेण्यास अडचणी येत आहेत.
शहरात शांतता क्षेत्र हवे
गडचिरोली शहरात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली. दिवसभर हॉर्नचा गोंगाट असतो. याशिवाय विविध कार्यक्रमांचे ध्वनीक्षेपक दिवसभर वाजत असतात. त्यामुळे नागरिकांना गोंगाटाचा सामना करावा लागतो. शहरात बगीचा वगळता विरंगुळ्याची एकही साधने नाहीत.
रुग्णांना होतो त्रास
• गडचिरोली शहरातील जिल्हा १ सामान्य रुग्णालय, जिल्हा महिला व बाल रुग्णालय राष्ट्रीय महामार्गालगत आहेत. सदर महामार्गावर वाहनांची वर्दळ असते.
वाहनांच्या कर्णकर्कश
• आवाजामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. याशिवाय जिल्हा मुख्यालयातील अनेक खासगी रुग्णालये रस्त्यालगत आहेत.
रुग्णालयात भरती असलेल्या या 3 रुग्णांनाही आवाजाचा त्रास होतो. विशेष म्हणजे, शाळकरी मुलांनाही ध्वनी प्रदूषणाचा त्रास होते. सध्या परीक्षेचे दिवस असल्याने व्यत्यय येत आहे.
कारवाई केव्हा होणार?
शहरातून मोठ्या प्रमाणात कर्णकर्कश आवाजात ध्वनीक्षेपके वाजविली जातात. याशिवाय डीजेचा सर्रास वापर केला जातो. अशा आयोजकांवर कारवाई करणे गरजेचे आहे. परंतु सार्वजनिक कार्यक्रमाच्या नावाखाली सुट दिली जाते.
"शहरातून कर्णकर्कश हॉर्न असलेली वाहने सुसाट धावतात. अशा वाहनांनवर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे."
- प्रफुल मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते.
उत्सवात डीजेचा दणदणाट
विविध सण, उत्सव तसेच जयंती, पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात डीजे लावून मिरवणूक काढली जाते. सदर मिरवणुकीतील डीजेच्या दणदणाटामुळे कानठिळ्या बसतात. प्रशासनाने आयोजकांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
१२० वाहनांना कर्णकर्कश ध्वनीक्षेपके
डेसीबलचा आवाज गोंगाटात गणला जातो. यापेक्षा कमी डेसीबल आवाज असणे गरजेचे आहे. स्थानिक प्रशासनाने सुद्धा याकडे लक्ष देऊन ध्वनी प्रदूषण होणार होणार नाही, नाही, याबाबत दक्षता घ्यावी.