शासनाविरोधात विदर्भवाद्यांचा गडचिरोलीत आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 11:58 PM2017-11-30T23:58:56+5:302017-11-30T23:59:14+5:30

स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी, तसेच शेतकºयांचे विविध प्रश्न तत्काळ माार्गी लावण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने येथील इंदिरा गांधी चौकात गुरूवारी आंदोलन करण्यात आले.

Gadchiroli resentment of Vidarbhaas against the government | शासनाविरोधात विदर्भवाद्यांचा गडचिरोलीत आक्रोश

शासनाविरोधात विदर्भवाद्यांचा गडचिरोलीत आक्रोश

Next
ठळक मुद्देजिल्हाभरातून कार्यकर्त्यांची उपस्थिती : स्वतंत्र विदर्भ राज्य घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा

ऑनलाईन लोकमत 
गडचिरोली : स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी, तसेच शेतकºयांचे विविध प्रश्न तत्काळ माार्गी लावण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने येथील इंदिरा गांधी चौकात गुरूवारी आंदोलन करण्यात आले. सभेनंतर खा. अशोक नेते यांच्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यासाठी मोर्चा नेत असताना गडचिरोली पोलिसांनी या विदर्भवादी मोर्चेकºयांना जि.प. माध्यमिक शाळेजवळ मोर्चाला थांबविले. या आंदोलनादरम्यान विदर्भवादी नेते व कार्यकर्त्यांनी शासनावर जोरदार टीका केली.
या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले, अ‍ॅड. वामनराव चटप, रंजना माकर्डे, नितीन भागवत, गडचिरोलीचे जिल्हा समन्वयक अरूण मुनघाटे आदींनी केले. इंदिरा गांधी चौैकात झालेल्या सभेत विदर्भवादी नेत्यांनी विद्यमान राज्य सरकारवर विदर्भ राज्य निर्मितीच्या मुद्यावर जोरदार ताशेरे ओढले. राज्य होण्यास विदर्भ सक्षम असतानाही सरकार विदर्भ राज्य निर्मितीच्या मुद्याला बगल देत आहे, असा आरोपही विदर्भवादी नेत्यांनी यावेळी केला.
आंदोलनात अशोक पोरेड्डीवार, वामन जुआरे, नामदेव लांडे, घिसू खुणे, अमिता मडावी, चंद्रशेखर भडांगे, देवराव म्हशाखेत्री, पांडुरंग घोटेकर, प्रकाश ताकसांडे, नाामदेव गडपल्लीवार, रमेश उप्पलवार, गोवर्धन चव्हाण, रघुनाथ तलांडे, राजेंद्रसिंह ठाकूर, चंद्रशेखर गडसुलवार, कमलेश भोयर, दत्तात्रय बर्लावार, जगदीश बद्रे, रूचित वांढरे, शालिक नाकाडे, एजाज शेख, बाळू मडावी, मनीषा सज्जनपवार, सोनाली पुण्यपवार, मनीषा दोनाडकर, दादाजी चुधरी, सुधाकर डोईजड, जनार्धन साखरे यांच्यासह जिल्हाभरातील विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते.
आता विदर्भ असक्षम कसा?
तीन वर्षांपूर्वी निवडणुकीदरम्यान विदर्भ नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न असल्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यास काही अडचण नाही. स्वतंत्र राज्यासाठी विदर्भ सक्षम आहे, असे भाजपच्या नेत्यांनी सांगितले होते. मात्र आता तीन वर्षानंतर स्वतंत्र राज्य होण्यासाठी विदर्भ असक्षम आहे, असे नेते सांगत आहेत, असे वामनराव चटप म्हणाले.

Web Title: Gadchiroli resentment of Vidarbhaas against the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.