गडचिरोलीत पोलिसाने झाडली स्वत: वर गोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 13:36 IST2019-03-27T13:36:10+5:302019-03-27T13:36:35+5:30
कोरची येथील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस शिपाई दर्रो आज बुधवारी सकाळी सातच्या दरम्यान पोलीस स्टेशन मध्ये स्वत:वर गोळी झाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

गडचिरोलीत पोलिसाने झाडली स्वत: वर गोळी
ठळक मुद्देउपचारासाठी नागपूरला हलवले
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: कोरची येथील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस शिपाई दर्रो आज बुधवारी सकाळी सातच्या दरम्यान पोलीस स्टेशन मध्ये स्वत:वर गोळी झाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण नंतर त्याला नागपूरला हलविण्यात आले.
पोलीस निरीक्षक गोरखनाथ दहिफळे यांनी सांगितले की पोलीस शिपाई दर्रो यांची तब्येत काही दिवसांपासून चांगली नाही. त्यामुळे कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा. अधिक वृत्त लवकरच देत आहोत.