Gadchiroli: फर्निचर व्यावसायिकाने दुकानातच संपवलं जीवन

By गेापाल लाजुरकर | Updated: December 15, 2024 20:20 IST2024-12-15T20:13:54+5:302024-12-15T20:20:58+5:30

Gadchiroli News: फर्निचर व्यावसायिकाने सकाळी दुकान उघडून दुपारपर्यंत सुरूच ठेवले. त्यानंतर दुकानातच गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना देसाईगंज शहराच्या गांधी वाॅर्डात रविवार, १५ डिसेंबर राेजी दुपारी ३ वाजता उघडकीस आली.

Gadchiroli: Furniture businessman ends life in shop | Gadchiroli: फर्निचर व्यावसायिकाने दुकानातच संपवलं जीवन

Gadchiroli: फर्निचर व्यावसायिकाने दुकानातच संपवलं जीवन

- गाेपाल लाजूरकर
गडचिराेली - फर्निचर व्यावसायिकाने सकाळी दुकान उघडून दुपारपर्यंत सुरूच ठेवले. त्यानंतर दुकानातच गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना देसाईगंज शहराच्या गांधी वाॅर्डात रविवार, १५ डिसेंबर राेजी दुपारी ३ वाजता उघडकीस आली.

उमेश माधव शिंगाडे (४५) रा. गांधीवाॅर्ड, देसाईगंज असे आत्महत्या करणाऱ्या व्यावसायिकाचे नाव आहे. उमेश शिंगाडे यांनी आपल्या घरापासूनच जवळपास ३०० मीटर अंतरावर भाड्याच्या खाेलीत फर्निचरचे दुकान थाटलेले आहे. नेहमीप्रमाणे रविवारीसुद्धा फर्निचरचे दुकान उघडले. सकाळपासूनच ते दुकानातच हाेते. दरम्यान, दुपारच्या सुमारास काही व्यक्ती त्यांच्या दुकानात साहित्य खरेदी करण्यासाठी आले; मात्र ते दिसले नाहीत. तेव्हा आतमध्ये जाऊन पाहिले असता तीन क्रमांकाच्या शेवटच्या खाेलीतील सिलिंगला असलेल्या लाेखंडी राॅडला दाेरीने गळफास घेतलेल्या स्थितीत ते आढळले. त्यानंतर देसाईगंज पाेलिस स्टेशनला माहिती देण्यात आली.

पाेलिसांनी त्यांचे शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मात्र, उमेश यांनी आत्महत्या का केली, याबाबतचे कारण कळू शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ आहे.

Web Title: Gadchiroli: Furniture businessman ends life in shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.