गडचिरोलीत ७०९ प्रकरण मंजूर
By Admin | Updated: July 24, 2014 23:52 IST2014-07-24T23:52:01+5:302014-07-24T23:52:01+5:30
स्थानिक तहसील कार्यालयात आज गुरूवारी शासनाच्या विविध योजनेतून निराधार, दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना अनुदान मंजूर करणाऱ्या समितीची बैठक घेण्यात आली.

गडचिरोलीत ७०९ प्रकरण मंजूर
४६ प्रकरण नामंजूर : श्रावणबाळ, बीपीएल, संजय गांधी निराधार योजनेची बैठक
गडचिरोली : स्थानिक तहसील कार्यालयात आज गुरूवारी शासनाच्या विविध योजनेतून निराधार, दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना अनुदान मंजूर करणाऱ्या समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष बाबुराव बावणे होते. यावेळी तहसीलदार डी. जी. जाधव व निवड समितीचे सदस्य अमिरअली नाथानी, नगरसेवक विजय गोरडवार, तुळशीदास भोयर, शाम कोल्हटकर, नायब तहसीलदार भुरसे आदी उपस्थित होते. या बैठकीत श्रावणबाळ योजनेतून दारिद्र्य रेषेखालील ३३५ लाभार्थ्यांना अनुदान मंजूर करण्यात आले. ९ लाभार्थ्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले. तसेच श्रावणबाळ योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील नसलेल्या २४४ लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहे. २३ अर्ज नामंजूर करण्यात आले. बैठकीत २६७ अर्ज आले होते. संजय गांधी योजनेचे १३० अर्ज मंजूर करण्यात आले. तर १४ अर्ज नामंजूर झाले आहेत. एकूण १४४ अर्ज समितीच्या समोर ठेवण्यात आले होते. तिनही योजनेचे मिळून ७०९ अर्ज समितीच्या समोर ठेवण्यात आले होते. तर ४६ अर्ज नामंजूर करण्यात आले. एकूण ७०९ लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. तिनही योजनेचे मिळून ७५५ अर्ज मंजूर झाले आहेत.