डीटीएड् कॉलेजचे भवितव्य अंधारात

By Admin | Updated: June 23, 2014 00:04 IST2014-06-23T00:04:48+5:302014-06-23T00:04:48+5:30

जिल्ह्यात एक डायट व खासगी व्यवस्थापनाचे १७ असे एकूण १८ डीटीएड् अध्यापक विद्यालय आहेत. या सर्व कॉलेजचे मिळून १ हजार १४० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. मात्र यंदा जिल्हाभरातून डीटीएड्च्या

The future of DTED College in the dark | डीटीएड् कॉलेजचे भवितव्य अंधारात

डीटीएड् कॉलेजचे भवितव्य अंधारात

शेकडो जागा शिल्लक राहणार : ११४० जागांसाठी फक्त १२० अर्ज स्वीकृत
गडचिरोली : जिल्ह्यात एक डायट व खासगी व्यवस्थापनाचे १७ असे एकूण १८ डीटीएड् अध्यापक विद्यालय आहेत. या सर्व कॉलेजचे मिळून १ हजार १४० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. मात्र यंदा जिल्हाभरातून डीटीएड्च्या शासकीय प्रवेशासाठी फक्त १२० नामाकंन अर्ज सादर करण्यात आले आहे. ८० टक्के शासकीय कोट्याचेही प्रवेश पूर्ण होणार नसल्याचे चित्र आहे. यामुळे जिल्ह्यातील खासगी व्यवस्थापनाच्या १७ डीटीएड् कॉलेजचे भवितव्य अंधारात असल्याचे दिसून येते.
पूर्वी प्राथमिक शिक्षकांची हमखास नोकरी म्हणून हजारो युवक डीटीएड् अभ्यासक्रमाकडे वळत होते. शासनानेसुध्दा त्यावेळी राज्यभरात अनेक डीटीएड् कॉलेजची खैरात वाटली. मात्र आता डीटीएड् पदविका मिळवूनही नोकरीची खात्री नसल्याने या अभ्यासक्रमाकडे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे.
जिल्ह्यात गडचिरोलीनजिक इंदाळा येथे एक शासकीय डायट कॉलेज आहे. गडचिरोली शहरात खासगी व्यवस्थापनाचे पाच डीटीएड् कॉलेज असून शहरातील सर्व कॉलेजची मिळून ४९० इतकी प्रवेश क्षमता आहे. धानोरा येथे खासगी व्यवस्थापनाचा एक, चामोर्शी शहरात एक, आष्टी येथे दोन, अहेरी येथे एक, भामरागड, सिरोंचा येथे एक, आरमोरी शहरात दोन, देसाईगंज शहरात एक, कुरखेडा येथे एक व वैरागड येथे दोन डीटीएड् कॉलेज आहेत. या कॉलेजमध्ये दरवर्षी २० टक्के व्यवस्थापन कोटा व ८० टक्के शासकीय कोट्यातून प्रवेश दिले जातात. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: The future of DTED College in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.