शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 05:53 IST

अपघातानंतर  ‘ट्रकचालकास अटक करा,’ अशी मागणी करून ग्रामस्थांनी महामार्ग साडेतीन तास अडवून ठेवला होता. परंतु चार विद्यार्थ्यांचा बळी घेणारा ट्रक अद्याप पोलिसांना सापडलेला नाही.

गडचिरोली : अज्ञात ट्रकच्या धडकेत मॉर्निंग वॉकला गेलेल्या चार शालेय विद्यार्थ्यांचा बळी गेल्याने शोकसागरात बुडालेल्या काटली गावातून शुक्रवारी सायंकाळी चौघांची अंत्ययात्रा एकाच वेळी निघाली आणि अवघा गाव हमसून, हमसून रडला.

 गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास झालेल्या या अपघातात तनवीर बालाजी मानकर (वय १६), टिंकू नामदेव भोयर (१४), दुष्यांत दुर्योधन मेश्राम (१५), तुषार राजेंद्र मारबते (१३, सर्व रा. काटली, ता. गडचिरोली) या चौघांचा मृत्यू झाला. आदित्य धनंजय कोहपरे (१४), क्षितिज तुळशीदास मेश्राम (१३) हे जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

ट्रक सापडेना, पोलिसांकडून सीसीटीव्हीची तपासणीअपघातानंतर  ‘ट्रकचालकास अटक करा,’ अशी मागणी करून ग्रामस्थांनी महामार्ग साडेतीन तास अडवून ठेवला होता. परंतु चार विद्यार्थ्यांचा बळी घेणारा ट्रक अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. पोलिसांनी गडचिरोली-आरमोरी मार्गावरील दुकाने, हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज  ताब्यात घेतले आहे.

अश्रूंचा फुटला बांधजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर सायंकाळी सहा वाजता मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. चारही मुलांची सायंकाळी साडेसहा वाजता गावातून एकाच वेळी अंत्ययात्रा काढण्यात आली. 

गावालगतच्या तलावाजवळ चार स्वतंत्र सरणावर त्यांना भडाग्नी दिला. यावेळी संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले होते. कुटुंबीय व नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला. हुंदके व अश्रूंनी वातावरण सुन्न झाले होते.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू