जिल्हा विकासाला निधी कमी पडू देणार नाही
By Admin | Updated: August 12, 2014 23:45 IST2014-08-12T23:45:04+5:302014-08-12T23:45:04+5:30
राज्य शासनाने गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात गडचिरोली जिल्ह्याच्या विकासावर लक्ष केंद्रित केले. राज्य सरकारने जिल्हा विकास निधीतून आतापर्यंत जिल्हा विकासासाठी ११७ कोटींचा निधी दिला.

जिल्हा विकासाला निधी कमी पडू देणार नाही
निर्धार मेळावा : अजित पवार यांचे प्रतिपादन
चामोर्शी : राज्य शासनाने गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात गडचिरोली जिल्ह्याच्या विकासावर लक्ष केंद्रित केले. राज्य सरकारने जिल्हा विकास निधीतून आतापर्यंत जिल्हा विकासासाठी ११७ कोटींचा निधी दिला. यापुढेही आपण जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
चामोर्शी येथे आयोजित निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राकाँचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोलीचे पालकमंत्री आर. आर. पाटील, जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम, जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, विभागीय निरीक्षक किशोर माथनकर, पक्ष निरीक्षक शब्बीर विद्रोही, गडचिरोली पं. स. च्या सभापती सविता कावळे, एटापल्लीच्या पं. स. सभापती ललीता मट्टामी, प्रदेश प्रतिनिधी सुरेश पोरेड्डीवार, तालुकाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, कार्यकारी अध्यक्ष बबलू हकीम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अमोल आर्इंचवार, युवा नेते ऋतुराज हलगेकर, रवींद्र वासेकर, श्रीकांत ओल्लांलवार, संतोष पालारपवार, विशेष दोषी, किशोर पिपरे, रितेश पालारपवार, अनिकेत भोगावार, महिला राकाँचा जिल्हाध्यक्ष पुष्पा अलोणे उपस्थित होत्या.
यावेळी पालकमंत्री पाटील यांनी नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिन लाऐंगेचा भ्रामक प्रचार केला. यामुळे आघाडीचा दारून पराभव झाला. ७० दिवसात या देशाला वास्तविक चित्र कळले. त्यामुळे आगामी निवडणुकीत या पराभवाचा बदला घेण्याची वेळ कार्यकर्त्यांनी गमावू नये, असे आवाहन केले. राकाँ प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी जिल्ह्यातील दोन जागा राकाँच्या कोट्यात घेण्याचा प्रयत्न केला जाईल. धर्म निरपेक्ष एकनिष्ठ महाराष्ट्र बनविणे व जातीयवादी शक्तींना रोखणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे काम आहे, असे प्रतिपादन केले. जिल्हाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांनी उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून भाग्यश्री आत्राम रिंगणात राहतील, असे अजित पवार यांच्यासमोर स्पष्ट केले. संचालन रवींद्र वासेकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)