मैत्री, प्रेम अन् अत्याचार.. अल्पवयीन वर्षीय मुलगी गर्भवती, आरोपीला अटक
By दिलीप दहेलकर | Updated: August 22, 2023 17:08 IST2023-08-22T17:07:38+5:302023-08-22T17:08:20+5:30
आरमोरी तालुक्यातील घटना

मैत्री, प्रेम अन् अत्याचार.. अल्पवयीन वर्षीय मुलगी गर्भवती, आरोपीला अटक
वडधा (जि. गडचिरोली) : अल्पवयीन मुलीशी ओळख झाली, त्याचे रुपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले. यातून युवकाने तिचे लैंगिक शोषण केले. ही धक्कादायक घटना आरमोरी तालुक्याच्या गावातील मात्र कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा पोलिस ठाणे हद्दीत २१ ऑगस्टला उघडकीस आली. दरम्यान, पीडित युवती सहा महिन्यांची गर्भवती आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अभय दिवाकर पदा (१९,रा. बाजीरावटोला, भाकरोंडी ) असे आरोपीचे नाव आहे. आरमोरी तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय युवतीला अभय पदा याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. गर्भधारणा झाल्यावर पीडित मुलीने लग्नाबाबत विचारले असता त्याने नकार दिला. त्यानंतर तिने तंटामुक्त समितीकडे धाव घेतली, समितीने पाठवलेल्या नोटीसलाही अभय पदा याने दाद दिली नाही. त्यानंतर पीडितेने मालेवाडा पोलिस ठाणे गाठले . तिच्या तक्रारीवरून बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पीडितेवर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून तपास पोलिस उपनिरीक्षक नारायण राठोड करीत आहेत.