शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
2
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
3
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
4
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
5
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
6
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
7
दर्यापुरात टोळक्याचा धुमाकूळ; अमरावती मार्गावर चालत्या वाहनांवर दगडफेक
8
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
9
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
10
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
11
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
12
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
13
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
14
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
15
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
16
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
17
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
18
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
19
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
20
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 

नऊ हजार विद्यार्थिनींचा मोफत प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 6:00 AM

गडचिरोली जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. यामागील मुख्य कारण शिक्षणाचे प्रमाण कमी हे आहे. शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केला जात आहे. मानव विकास मिशन अंतर्गत गडचिरोली आगाराला ४९ तर अहेरी आगाराला ४२ बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत.

ठळक मुद्देसंडे अँकर । पाचवी ते बारावीपर्यंत लाभ; मानव विकास मिशन व अहिल्याबाई होळकर बस पास योजना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मानव विकास मिशन व अहिल्याबाई होळकर योजनंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पाचवी ते बारावीपर्यंतच्या सुमारे ९ हजार १५६ विद्यार्थिनी मोफत प्रवासाचा लाभ घेत आहेत.राज्यात मुलांच्या तुलनेत मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. तसेच गळतीचे प्रमाणही अधिक आहे. लहान गावात चवथीपर्यंत तर मोठ्या गावात सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. पाचवी नंतरच्या शाळा मोठ्या गावातच आहेत. दुसऱ्या गावी शाळा असल्याने बहुतांश विद्यार्थिनी चवथीनंतर शाळा सोडत होत्या. मुले सायकलने जात असले तरी मुली सायकलने प्रवास करण्यास धजावत नाही. विद्यार्थिनींना बसने मोफत प्रवास करता यावा यासाठी राज्य शासनाने अहिल्याबाई होळकर मोफत बस पास योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत बस पास उपलब्ध करून दिल्या जातात. ही योजना राज्यभरातील विद्यार्थिनींसाठी लागू आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील ४ हजार ९६१ विद्यार्थिंनींना दिला जात आहे.गडचिरोली जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. यामागील मुख्य कारण शिक्षणाचे प्रमाण कमी हे आहे. शिक्षणाचे प्रमाण वाढविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केला जात आहे. मानव विकास मिशन अंतर्गत गडचिरोली आगाराला ४९ तर अहेरी आगाराला ४२ बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. या बसेस विद्यार्थिनींची शाळा ते गाव या दरम्यान शाळा भरणे व सुटण्याच्या वेळेत चालविल्या जातात. मानव विकास मिशनच्या बसमधून जिल्ह्यातील एकूण ४ हजार २४० विद्यार्थिनींची वाहतूक केली जाते. देसाईगंज तालुका वगळता जिल्ह्यातील इतर सर्वच तालुक्यांमध्ये मानव विकास मिशनच्या बसेसची सेवा दिली जाते. बसचा खर्च म्हणून शासन प्रत्येक महिन्याला एका बससाठी ६४ हजार रूपये अनुदान उपलब्ध करून देते.विद्यार्थिनींच्या तुलनेत बसेस अपुऱ्या२०११ मध्ये मानव विकास मिशनच्या बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या. मागील आठ वर्षात शिक्षण घेणाºया विद्यार्थिनींची संख्या वाढली आहे. त्यामुळे मानव विकास मिशनच्या बसमध्ये विद्यार्थिनींची गर्दी होते. तसेच काही मार्गावर अजुनही बस धावत नाही. अधिकच्या बसेस उपलब्ध झाल्यास नवीन मार्गांवर बसेस चालवून विद्यार्थिनींची वाहतूक करण्यास मदत होईल. शासनाने बसेस उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीstate transportएसटी