समृद्धी, कॉरिडॉरसाठी शासकीय जमिनी मोफत; मुख्यमंत्र्यांनी घेतला भूसंपादनाचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 16:09 IST2026-02-04T16:01:51+5:302026-02-04T16:09:08+5:30

Gadchiroli : जिल्ह्याच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या भंडारा-गडचिरोली समृद्धी महामार्ग आणि नवेगाव-सुरजागड मिनरल कॉरिडॉर या प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेला आता प्रचंड वेग मिळणार आहे.

Free government land for Samruddhi, corridor; Chief Minister reviews land acquisition | समृद्धी, कॉरिडॉरसाठी शासकीय जमिनी मोफत; मुख्यमंत्र्यांनी घेतला भूसंपादनाचा आढावा

Free government land for Samruddhi, corridor; Chief Minister reviews land acquisition

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
जिल्ह्याच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या भंडारा-गडचिरोलीसमृद्धी महामार्ग आणि नवेगाव-सुरजागड मिनरल कॉरिडॉर या प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेला आता प्रचंड वेग मिळणार आहे. मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात एका उच्चस्तरीय बैठकीत या प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेऊन कामाला गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. विशेष म्हणजे शासकीय जमिनी या प्रकल्पासाठी विनामूल्य देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्ह्यात लोहखनिजाचे अफाट साठे आहेत. मात्र, दळणवळणाच्या सोयींअभावी या साधनसंपत्तीचा जिल्ह्याला अपेक्षित फायदा मिळत नव्हता. नियोजित नवेगाव मोर-कोनसरी-हेडरी-सुरजागड मिनरल कॉरिडॉरमुळे खनिजाची वाहतूक सुलभहोईल आणि स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.

अजित पवार यांच्या उपस्थितीत चौपदरीकरणाला मंजुरी

यापूर्वी २७ जानेवारी रोजी नवेगाव मोर-कोनसरी-हेडरी-सुरजागड या कॉरिडॉरच्या ८५.६७ किमी लांबीच्या कॉरिडॉरला चौपदरीकरणाची मंजुरी देण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते, दुसऱ्याच दिवशी त्यांचे विमान दुर्घटनेत निधन झाले. अजित पवार यांच्या कार्यकाळातील हा महत्त्वाचा शेवटचा प्रशासकीय निर्णय ठरला होता.

Web Title : समृद्धि कॉरिडोर के लिए मुफ्त सरकारी जमीन: मुख्यमंत्री ने भूमि अधिग्रहण की समीक्षा की

Web Summary : मुख्यमंत्री ने भंडारा-गढ़चिरौली समृद्धि महामार्ग और नवेगांव-सुरजागढ़ खनिज गलियारा परियोजनाओं के लिए भूमि अधिग्रहण में तेजी लाने के निर्देश दिए। सरकार मुफ्त में जमीन देगी। इन परियोजनाओं का उद्देश्य खनिज परिवहन में सुधार करके गढ़चिरौली जिले में विकास को बढ़ावा देना और रोजगार प्रदान करना है।

Web Title : Free Land for Samruddhi Corridor: CM Reviews Land Acquisition

Web Summary : Chief Minister expedited land acquisition for the Bhandara-Gadchiroli Samruddhi Mahamarg and Navegaon-Surjagad Mineral Corridor projects. The government will provide land for free. The projects aim to boost development and provide employment in the Gadchiroli district by improving mineral transportation.