नाेकरीची तयारी करणाऱ्या युवक-युवतींना मोफत पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 05:00 IST2021-09-10T05:00:00+5:302021-09-10T05:00:34+5:30

पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, समीर शेख, सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर  यांच्या उपस्थितीत राजाराम खांदला येथे ९ सप्टेंबरला हा कार्यक्रम झाला.  या कार्यक्रमासाठी द विनर्स अकॅडमी औरंगाबादचे संचालक बाळासाहेब शिंदे, पोलीस भरती मिनी ठोकळाचे लेखक राजेश मेशे पुणे, बीएसएफचे सहायक कमांडंट श्रीनिवास चौधरी यांनीही योगदान दिले.  

Free books for young people preparing for Nakeri | नाेकरीची तयारी करणाऱ्या युवक-युवतींना मोफत पुस्तके

नाेकरीची तयारी करणाऱ्या युवक-युवतींना मोफत पुस्तके

लाेकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली/कमलापूर : दुर्गम भागातील युवक-युवतींना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या पोलीस दलाच्या वतीने अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला येथे होतकरू युवक-युवतींना मार्गदर्शन करून मोफत पुस्तकेही उपलब्ध करून दिली. पोलीस भरतीसाठी उपयुक्त असणाऱ्या त्या पुस्तकांमधून अनेक जणांच्या पोलीस दलातील प्रवेशाचा मार्ग सुकर होणार आहे.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, समीर शेख, सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर  यांच्या उपस्थितीत राजाराम खांदला येथे ९ सप्टेंबरला हा कार्यक्रम झाला. 
या कार्यक्रमासाठी द विनर्स अकॅडमी औरंगाबादचे संचालक बाळासाहेब शिंदे, पोलीस भरती मिनी ठोकळाचे लेखक राजेश मेशे पुणे, बीएसएफचे सहायक कमांडंट श्रीनिवास चौधरी यांनीही योगदान दिले.  
कार्यक्रमाला उपपोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भोरे, उपनिरीक्षक विजय कोल्हे, गणेश कड, केशव  केंद्रे, सीआरपीएफचे पोलीस निरीक्षक अखिलेश पाठक, एसआरपीएफचे उपनिरीक्षक गजानन खेत्रे आणि जिल्हा पोलीस दलाचे अंमलदार  हजर होते. 

पाेलीस भरतीसाठी होणार लाभ
- राजाराम खांदरा उपपोलीस स्टेशन हद्दीमधील गावात जे युवक-युवती पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांना मार्गदर्शन करून मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आले. त्यात गरीब व गरजू कुटुंबातील ३९ युवक आणि २१ युवती अशा ६० जणांचा समावेश आहे. 
- एम्स अकॅडमी गडचिरोलीचे संचालक अभिजित मोहुर्ले यांनी आगामी पोलीस भरतीची मैदानी व लेखी परीक्षेची तयारी कशी करावी, याबाबत उपस्थित युवक-युवतींना मार्गदर्शन केले.

 

Web Title: Free books for young people preparing for Nakeri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस