चार जोडपी विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 01:07 IST2018-04-29T01:07:08+5:302018-04-29T01:07:08+5:30
देसाईगंज तालुक्यातील मोहटोला (किन्हाळा) येथे शुक्रवारी श्री हनुमान सार्वजनिक बहुद्देशीय मंडळाच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात चार जोडपी विवाहबद्ध झाली. सामूहिक विवाह सोहळ्याचे हे १९ वे वर्ष आहे.

चार जोडपी विवाहबद्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहटोला (किन्हाळा) : देसाईगंज तालुक्यातील मोहटोला (किन्हाळा) येथे शुक्रवारी श्री हनुमान सार्वजनिक बहुद्देशीय मंडळाच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात चार जोडपी विवाहबद्ध झाली. सामूहिक विवाह सोहळ्याचे हे १९ वे वर्ष आहे.
या सोहळ्याला आ. कृष्णा गजबे, नागरी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, सामाजिक कार्यकर्ते भाग्यवान खोब्रागडे, पं. स. सभापती मोहन गायकवाड, जि. प. सदस्य रमाकांत ठेंगरी, रोशनी पारधी, उपसभापती गोपाल उईके, सरपंच कैलास पारधी, पंकज खरवडे, नगरसेवक राजू जेठानी, नरेश विठ्ठलानी, पं. स. सदस्य अशोक नंदेश्वर, माजी जि. प. सदस्य नंदू नरोटे, दिगांबर मेश्राम, मंगला शेंडे, राजू रासेकर, नंदू नाकतोडे, कैलास प्रधान, ताराबाई धनबाते, साधना बुल्ले, राजू झरकर, माजी पं. स. सभापती परसराम टिकले, उपसरपंच कैैलास राणे, पंढरी नखाते उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना आ. कृष्णा गजबे म्हणाले, दिवसेंदिवस विवाह सोहळ्याचा खर्च वाढत आहे. त्यामुळे सामूहिकरित्या विवाह सोहळा आयोजित केल्यास अत्यल्प खर्च येतो. तसेच योग्य व्यवस्था होऊन अन्नाचीही नासाडी थांबविली जाते, असे प्रतिपादन केले.
उपस्थित वºहाड्यांना रिझविण्याकरिता दिवाकर बारसागडे व त्यांच्या सहकार्यांनी संगीत मैैफिल सादर केली. या मैैफिलीमुळे अनेकांचे मनोरंजन झाले. दरम्यान भाग्यवान खोब्रागडे, प्रकाश पोरेड्डीवार, परसराम टिकले यांनीही मार्गदर्शन करीत सामूहिक विवाह सोहळ्याची गरज प्रतिपादीत केली.
कार्यक्रमाचे संचालन प्रास्तविक मंडळाचे अध्यक्ष रमाकांत ठेंगरी यांनी तर आभार रामदास बुल्ले यांनी मानले. कार्यक्रमाला गावातील नागरिक, वधुवरांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.