शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीसाठी वनविभाग सज्ज

By admin | Updated: May 6, 2016 01:15 IST

संपूर्ण महाराष्ट्रात १ ते ७ जुलै दरम्यान वनमहोत्सव कार्यक्रम राबविला जाणार आहे. या कालावधीत सहा लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार असून यासाठी वन विभाग सज्ज आहे,

मुख्य वनसंरक्षकांची माहिती : सहा लाख वृक्षांची होणार लागवडगडचिरोली : संपूर्ण महाराष्ट्रात १ ते ७ जुलै दरम्यान वनमहोत्सव कार्यक्रम राबविला जाणार आहे. या कालावधीत सहा लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार असून यासाठी वन विभाग सज्ज आहे, अशी माहिती मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार यांनी दिली आहे. जागतिक तापमानात होत असलेली वाढ, वातावरणातील बदल, बदलले निसर्ग व ऋतू चक्र, अनियमित पर्जन्यमान हे पर्यावरणाचे संतुलन बिघडल्याची जाणीव करून देत आहे. पर्यावरण संवर्धनात वृक्षांचे विशेष महत्त्व आहे. वाढते औद्योगिकरण, शहरीकरण, वाढती लोकसंख्या यामुळे वनांवर होणाऱ्या अनिष्ठ परिणामाची व पर्यायाने पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन शासनाने वनमहोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यभरात २ कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. गडचिरोली वन विभाग स्वत: ५ लाख वृक्ष लागवड करणार आहे. एक लाख वृक्षांच्या लागवडीबाबत जिल्हा नियोजन समितीने नियोजन केले आहे. १ जुलै या एकाच दिवशी जिल्हाभरात किमान ६ लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, संयुक्त वनव्यवस्थापन समिती, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, लोकप्रतिनिधी यांचा लोकसहभाग घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जास्तीत नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यावर्षीही वृक्ष लागवडीला प्रचंड प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)