शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
3
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
4
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
5
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
6
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
7
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
8
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
9
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
10
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
11
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
12
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
13
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
14
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
15
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
16
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
17
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
18
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
19
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
20
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांचा पाठपुरावा करणार

By admin | Updated: September 10, 2016 01:20 IST

बुधवारच्या मध्यरात्री आरमोरी येथील मुख्य बाजारपेठेतील सराफा लाईनमधील दोन ज्वेलर्सचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी

आमदारांचे आश्वासन : सराफा व्यावसायिकांची आरमोरीत घेतली भेटआरमोरी : बुधवारच्या मध्यरात्री आरमोरी येथील मुख्य बाजारपेठेतील सराफा लाईनमधील दोन ज्वेलर्सचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख १६ हजार रूपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिणे लंपास केले. या पार्श्वभूमीवर आमदार क्रिष्णा गजबे यांनी शुक्रवारी चोरी झालेल्या सराफा दुकानांना भेट देऊन सराफा व्यावसायिकांशी चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेत व्यावसायिकांच्या समस्या प्रशासनस्तरावर मांडून त्यांचा पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. आ. क्रिष्णा गजबे यांनी सुमंगल ज्वेलर्स, राजू बेहरे ज्वेलर्स, रॉयल पाईप हाऊस दुकानाला भेट दिली असता, आरमोरी शहरात सुरक्षा व्यवस्था सुरळीत करावी, अज्ञात चोरट्यांना तत्काळ अटक करावी, मार्केट, सराफा लाईनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, पोलीस बंदोबस्त वाढविण्यासाठी पोलीस प्रशासनाला निर्देश द्यावे, आदी मागण्या आमदारांपुढे मांडल्या असता, आ. क्रिष्णा गजबे यांनी सदर समस्यांचा पाठपुरावा प्रशासनाकडे करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सराफा असोसिएशनचे अध्यक्ष विजय खरवडे, उपाध्यक्ष दीपक बेहरे, प्रकाश बेहरे, अरूण हर्षे, सहसचिव पंकज खरवडे, भाजप तालुकाध्यक्ष नंदू पेट्टेवार, युवा नेते भारत बावनथडे, नंदू नाकतोडे, राजू बेहरे, विनोद बेहरे, युगल सामृतवार, स्वप्नील धात्रक, गोलू वाघरे, रोहित धकाते, राहुल तितीरमारे, सचिन बेहरे, अंकुश खरवडे, अमर खरवडे व पदाधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)सराफा व्यावसायिक पोलीस अधीक्षकांना भेटणारआरमोरी येथील सराफा व्यावसायिकांची दुकाने फोडून सोने-चांदीचे दागिणे लंपास करणाऱ्या चोरट्यांचा छडा लावण्याची मागणी करण्यासाठी सराफा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह आ. क्रिष्णा गजबे जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत. याशिवाय आ. क्रिष्णा गजबे यांनी पं. स. च्या वार्षिक आमसभेत आरमोरी शहरातील सुरक्षा व्यवस्था सुरळीत करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना दिल्या.