शाश्वत शेती विकासाचा केंद्रबिंदू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:23 IST2021-07-22T04:23:24+5:302021-07-22T04:23:24+5:30
कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली येथे १९ जुलै रोजी शास्त्रीय सल्लागार समितीची चौदावी सभा पार पडली. याप्रसंगी ते बाेलत हाेते. ...

शाश्वत शेती विकासाचा केंद्रबिंदू
कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली येथे १९ जुलै रोजी शास्त्रीय सल्लागार समितीची चौदावी सभा पार पडली. याप्रसंगी ते बाेलत हाेते. याप्रसंगी सिंदेवाही संशाेधन केंद्राचे विभागीय सहयाेगी संशाेधन संचालक डॉ.ए.व्ही. कोल्हे, अकाेला येथील मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.प्रकाश कडू, कृषी महाविद्यालयातील प्रभारी सहयाेगी अधिष्ठाता डॉ.माया राऊत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक संदीप कऱ्हाळे, डॉ.शालिनी बडगे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक आर.जी. चौधरी, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त डॉ.वैद्य, दुग्धविकास अधिकारी सचिन यादव, पशुधन विकास अधिकारी डॉ.कुमरे, डॉ.मेश्राम, कृषी विकास अधिकारी दादाजी तुमसरे, सहायक वनसंरक्षक साेनल भडके, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ समन्वय अधिकारी कांता मिश्रा, उमेदच्या जिल्हा व्यवस्थापिका चेतना लाटकर उपस्थित हाेते.
शास्त्रीय सल्लागार समितीच्या मागील सभेचा अहवाल, २०२०-२१चा प्रगती अहवाल, प्रथम रेषीय प्रात्यक्षिकांचा अहवाल, नियोजित चाचणी अहवाल, तसेच बीजोत्पादन कार्यक्रम अहवाल कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक संदीप कऱ्हाळे यांनी चित्रफितीद्वारे सादर केला. त्याचप्रमाणे, नाबार्ड अंतर्गत कृषीविषयक विविध योजना राबविण्याचे सुचविले, तसेच कृषिविभागांतर्गत योजनांचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा करून देण्यासाठी सर्व विभागांनी मदत करावी व कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोलीच्या विशेषज्ञांच्या मदतीने नवीन तंत्रज्ञानाची माहिती करून घ्यावी, असे आवाहन डाॅ.विलास खर्चे यांनी केले.
डॉ.प्रकाश कडू यांनी अधिक उत्पादनाकरिता मृदा तपासणी करून जमिनीतील मूलद्रव्यांची पूर्तता करणे आवश्यक आहे. आवश्यकतेनुसार खताची मात्रा द्यावी, तेव्हाच जमिनीचे आरोग्य टिकविता येईल, असे प्रतिपादन केले.
सभेला विषय विशेषज्ञ पुष्पक ए. बोथीकर, ज्ञानेश्वर ताथोड, डॉ.विकस कदम, एन.पी. बुद्धेवार, नीलिमा पाटील, दीपक चव्हाण, माेहीतकुमार गणवीर, हवामान निरीक्षक शशिकांत सलामे, अंकुश ठाकरे, तसेच शेतकरी उपस्थित होते.
बाॅक्स
कृषी निविष्ठा व साहित्य वाटप
शास्त्रीय सल्लागार समितीच्या बैठकीदरम्यान कृषी विद्यापीठाच्या विज्ञान कृषी रसायनशास्त्र विभाग सूक्ष्म व दुय्यम प्रकल्पांतर्गत अनुसूचित जातीच्या महिला शेतकऱ्यांना फवारणी पंप, तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांना पीडीकेव्ही मायक्राे ग्रेड २ चे वाटप करण्यात आले, तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने समूह प्रथम रेषीय पीक प्रात्यक्षिकांतर्गत तूर बियाणे आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत धान बियाणे वाटप करण्यात आले.