शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
2
Top Marathi News LIVE Updates: हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला नागपुरातून अटक
3
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
4
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
5
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
6
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
7
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
8
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
9
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
10
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
11
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
12
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
13
भोंदू खरातसोबत कथित व्यवहार प्रकरण; रुपाली चाकणकर यांची साडेआठ तास ईडी चौकशी
14
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
15
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
16
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
17
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
18
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
19
Mumbai Murder: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
20
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
Daily Top 2Weekly Top 5

कुरखेडा शहरातील समस्या सोडवा

By admin | Updated: June 24, 2015 02:40 IST

पावसाळ्याला सुरुवात झाली असून साथीचे रोग पसरू नयेत यासाठी शहरातील समस्या सोडविण्यात याव्या,

आंदोलनाचा दिला इशारा : भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगर पंचायतीच्या प्रशासकांना निवेदन
कुरखेडा : पावसाळ्याला सुरुवात झाली असून साथीचे रोग पसरू नयेत यासाठी शहरातील समस्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रशासक यू. एम. तोडसाम यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शहरातील बहुतांश पथदिवे बंद आहेत. पावसाळ्यात साप, विंचू, कीटक बाहेर निघतात. त्यामुळे अंधारात त्यांच्याकडून दंश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर पंचायतीने प्राधान्याने पथदिवे लावण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊन पथदिवे लावावे. शहरातील अनेक नाल्या मागील दोन वर्षांपासून उपसण्यात आल्या नाही. परिणामी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ व कचरा जमा झाला आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. परिणामी डासांची पैदास वाढण्याची शक्यता असल्याने नाल्यांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
विहिरीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्यात यावे, वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अनेक रस्त्यांवर बांधकामाचे साहित्य ठेवले आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सदर साहित्य उचलण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राम लांजेवार, विलास गावंडे, गणपत सोनकुसरे, चांगदेव फाये, रवी गोटेफोडे, नागेश फाये, रामहरी उगले, मुजाहीद शेख, लता सहारे आदी उपस्थित होते. शहरातील समस्या तत्काळ न सोडविल्यास आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)