शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवाशांना लुबाडणारे पाच लुटारू अटकेत

By admin | Updated: September 18, 2014 23:35 IST

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम हिसकाविणाऱ्या पाच आरोपींना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयाने येत्या

गोंदिया : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम हिसकाविणाऱ्या पाच आरोपींना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयाने येत्या २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून लुटमारीच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.संजू मुरारी पडूरकर (रा.कुडवा), सनी हिशेब भेलावे (रा.कुंभारेनगर), गोलू उर्फ आकाश चौधरी (गोंडीटोला, कुडवा), रोहीत प्रेमलाल मेश्राम व धनराज उर्फ टिंकू राजेंद्र राऊत (रा.कुंभारेनगर) अशी आरोपींची नावे असून ते गोंदिया व आजुबाजूच्या परिसरातीलच रहिवासी आहेत.रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नरेश मदनलाल येलसरे (२५) व दुर्गेश शिवचरण प्रधान (२४, रा.मजीतपूर, गंगाझरी) हे १७ सप्टेंबर रोजी रायपूर-इतवारी पॅसेंजर गाडीने गंगाझरीला जाण्यासाठी सालेकसा येथून चढले होते. सायंकाळी ७.१५ वाजतादरम्यान या आरोपींनी येलसरे व प्रधान या प्रवाशांना धावत्या गाडीत गंगाझरी जवळ-जवळ शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केली. तसेच येलसरेंचा मोबाईल व रोख ५४० रूपये असलेली पर्स तसेच प्रधान यांचा ९० रूपये रोख असलेली पर्स हिसकावून गाडीतून पळून काढला. यानंतर दोन्ही प्रवाशांनी गंगाझरी स्टेशन मास्तरांना या लुटमारीची माहिती दिली. त्यांनी लगेच गोंदिया रेल्वे पोलिसांना माहिती दिली. लगेच रेल्वे पोलिसांचे पथक गंगाझरीला रवाना झाले. दरम्यान खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पथकाने आरोपींचा शोध सुरू केला असता यातील एक आरोपी तिरोडा येथे तर अन्य चार तुमसर येथे हाती लागले. तसेच त्यांचा एक साथीदार पसार झाल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेला मोबाईल व कुकरी जप्त केली आहे. या आरोपींना गुरूवारी (दि.१८) नागपूर येथे न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना २३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे, या आरोपींवर गोंदिया शहर पोलिसांत अन्य गुन्हे दाखल असल्याची माहिती रेल्वेचे पोलिस निरीक्षक संजय सिंग यांनी दिली. घटनेच्या काही तासांतच आरोपींना पकडण्यात यश आले असून ही कामगिरी पोलीस निरीक्षक सिंग, पोलीस उपनिरीक्षक सुरेश बोधी, आरपीएफचे निरीक्षक माणिकचंद, तुमसरचे रेल्वे पोलीस उपनिरीक्षक टेंभूर्णीकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक विनोद टप्पे, हवालदार शैलेश उके, रोशन मोगरे, विजय नंदनवार, आरक्षक एस.एस.कुशवाह व अन्य कर्मचाऱ्यांनी यशस्वी केली. (शहर प्रतिनिधी)