हाेळीच्या पर्वावर जिल्ह्यातील दाेन अपघातांमध्ये पाच जणांनी गमावले जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 05:00 IST2021-03-29T05:00:00+5:302021-03-29T05:00:23+5:30
आष्टीजवळील चंदनखेडी फाट्याजवळ बसने पीकअप वाहनाला जाेरदार धडक दिली. या धडकेत मिरची ताेडायला गेलेल्या तीन मजुरांसह वाहनचालक ठार झाला. तर १५ मजूर जखमी आहेत. हे सर्व मजूर ब्रह्मपुरी तालुक्यातील बाेडधा, हळदा, आवळगाव, डाेंगरगाव येथील आहेत. जखमी मजुरांमध्ये काही मजूर गंभीर जखमी आहेत. जखमी मजुरांवर गडचिराेली व चंद्रपूर येथील रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. धडक देणारी बस अहेरी आगाराची आहे.

हाेळीच्या पर्वावर जिल्ह्यातील दाेन अपघातांमध्ये पाच जणांनी गमावले जीव
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : दाेन वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. तर एकूण १८ जण जखमी झाले आहेत. हाेळीच्या सणाचा दिवस अपघातवार ठरला आहे.
यातील एक अपघात आष्टीजवळील आहे. या अपघातात ब्रह्मपुरी तालुक्यातील तेलंगणा राज्यात मिरची ताेडण्यासाठी जाणारे मजूर ठार झाले. तर गडचिराेली तालुक्यातील शिवणीजवळच्या अपघातात कारवाफा येथील दुचाकीस्वार ठार झाला आहे. चामाेर्शी मार्गाच्या सिमेंट काॅंक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येते.
शिवणी गावाजवळ दुचाकीस्वार ठार
गडचिराेली तालुक्यातील शिवणी गावाजवळ दुचाकी व पिकअप वाहन यांच्यामध्ये शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास धडक बसली. या धडकेत दुचाकी चालक जागीच ठार झाला. तर दुचाकीवरील दाेघे जखमी झाले आहेत. प्रणय चंदन साेनेवार रा. कारवाफा असे मृताचे नाव आहे. तर सुरेश माेरेश्वर साेमेवार व माेरेश्वर साेमेवार अशी जखमींची नावे आहेत. हे तिघेही जण कारवाफावरून डाेंगरगाव मार्गे चामाेर्शीकडे एमएच ३३ झेड ३३५४ क्रमांकाच्या दुचाकीने जात हाेते. दरम्यान शिवणी गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या राईसमिलजवळ एमएच २० डीई ७५३८ क्रमांकाच्या पीकअप वाहनाला धडक बसली. धडक एवढी जबर हाेती की दुचाकीची इंजिन फुटले. तसेच दुचाकी चालक जागीच ठार झाला. इतर जखमींना गडचिराेली रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच गडचिराेली पाेलीस स्टेशनचे ठाणेदार मंडलवार यांच्या नेतृत्वात पाेलिसांनी घटनास्थळ गाठून दाेन्ही वाहने ठाण्यात जमा केली. पिकअप वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शाेध पाेलीस घेत आहेत.
चंदनखेडी फाट्याजवळ मिरची ताेडणाऱ्या मजुरांवर अपघाताचा घाला
आष्टीजवळील चंदनखेडी फाट्याजवळ बसने पीकअप वाहनाला जाेरदार धडक दिली. या धडकेत मिरची ताेडायला गेलेल्या तीन मजुरांसह वाहनचालक ठार झाला. तर १५ मजूर जखमी आहेत. हे सर्व मजूर ब्रह्मपुरी तालुक्यातील बाेडधा, हळदा, आवळगाव, डाेंगरगाव येथील आहेत. जखमी मजुरांमध्ये काही मजूर गंभीर जखमी आहेत. जखमी मजुरांवर गडचिराेली व चंद्रपूर येथील रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. धडक देणारी बस अहेरी आगाराची आहे.
आरमाेरी मार्गावर एक दुचाकीस्वार गंभीर जखमी
गडचिराेली शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या आरमाेरी मार्गावरील प्लॅटनिक ज्युबिली शाळेजवळ बाेलाेरा वाहन व दुचाकी यांची धडक झाली. हा अपघात रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडला. या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे.