आराेग्य विभागातील गट ‘क’ ची रिक्त पदे नव्या ओबीसी आरक्षणाने भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:40 IST2021-09-22T04:40:14+5:302021-09-22T04:40:14+5:30
गडचिराेली : अलीकडे हाेऊ गडचिराेली जिल्हा परिषदेच्या आराेग्य विभागातील गट ‘क’ मधील रिक्त पदे नव्याने मिळालेल्या १७ टक्के ओबीसी ...

आराेग्य विभागातील गट ‘क’ ची रिक्त पदे नव्या ओबीसी आरक्षणाने भरा
गडचिराेली : अलीकडे हाेऊ गडचिराेली जिल्हा परिषदेच्या आराेग्य विभागातील गट ‘क’ मधील रिक्त पदे नव्याने मिळालेल्या १७ टक्के ओबीसी आरक्षणाने भरण्यात यावीत, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ओबीसी बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्यांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, गडचिराेली जि.प. आराेग्य विभागातील गट ‘क’ मधील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात २९ ऑगस्ट २०१९ राेजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२१ आहे. अलीकडेच राज्याच्या मंत्रिमंडळाने जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण ६ टक्क्यांवरून १७ टक्के करण्याचा निर्णय झाला आहे. आराेग्य विभागातील गट ‘क’ मधील रिक्त पदे १७ टक्के आरक्षणानुसार भरावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शेषराव येलेकर, जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, सचिव प्रा. देवानंद कामडी, उपाध्यक्ष पांडुरंग गाेटेकर, जिल्हा संघटक सुरेश भांडेकर, महेंद्र ब्राम्हणवाडे, नगरसेवक सतीश विधाते यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.