सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:39 IST2021-04-23T04:39:25+5:302021-04-23T04:39:25+5:30
सौरभ व्यंकटेश नारेंद्रलवार (४५) रा. इंदाराम असे आरोपीचे नाव आहे. अवैध दारूची तस्करी होत असल्याची माहिती अहेरी पोलिसांना प्राप्त ...

सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल
सौरभ व्यंकटेश नारेंद्रलवार (४५) रा. इंदाराम असे आरोपीचे नाव आहे.
अवैध दारूची तस्करी होत असल्याची माहिती अहेरी पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार इंदाराम येथील नदी घाटावर पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या सापळा रचला. दरम्यान दारू विक्रेता फरार होण्यास यशस्वी झाला. मात्र आंध्रप्रदेशात सुगंधित तंबाखूची विक्री करणारा इंदाराम येथील दुकानदार पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याची तपासणी केली असता ८ हजार ४०० रुपयांचे सुगंधित तंबाखूचे डब्बे आढळून आले. संपूर्ण मुद्देमाल जप्त करीत अहेरी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात भा.दं.वि. १८८ व२७३ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक आरती नरोटे, मुक्तिपथ तालुका संघटक केशव चव्हाण, पोलिस कर्मचारी प्रशांत हेडावू, विनोद रणदिवे, मनोज कुमरे यांनी केली.