शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

नात्याची गाठ बांधून परतताना नियतीचा घाला, धावत्या दुचाकीने पेट घेतल्याने होरपळून मृत्यू

By संजय तिपाले | Updated: March 14, 2026 12:49 IST

Gadchiroli : नात्याच्या गाठी बांधण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीवर नियतीने घाला घातला. आपल्या नातेवाइकाचे लग्न जुळवून आनंदाने घरी परतत असताना वाटेतच दुचाकीने पेट घेतला अन् यात होरपळून त्यांचा मृत्यू झाला.

गडचिरोली : नात्याच्या गाठी बांधण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीवर नियतीने घाला घातला. आपल्या नातेवाइकाचे लग्न जुळवून आनंदाने घरी परतत असताना वाटेतच दुचाकीने पेट घेतला अन् यात होरपळून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा मार्गावर १३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.

सिमन दसरू हिचामी (४२, रा. कृष्णार ता. एटापल्ली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते १३ मार्च रोजी आपल्या नातेवाइकाचे लग्न जुळवण्यासाठी चंदनवेली येथे गेले होते. लग्न जुळविल्यानंतर जेवण करुन ते चंदनवेली गावावरून आपले काम आटोपून सिमन हे आपल्या दुचाकीने (एमएच ३३ एई- २७३९) घराकडे निघाले होते. एटापल्ली - बारसेवाडा रोडवर शहरापासून अवघ्या ३ किमी अंतरावर असताना अचानक त्यांच्या दुचाकीने पेट घेतला. काही कळायच्या आत आगीने रौद्र रूप धारण केले आणि सिमन यांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. या भीषण घटनेत त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलिसांची धाव, तपासचक्रे गतिमान

घटनेची भीषणता पाहून एटापल्ली पोलिस आणि फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने तात्काळ धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला . धावत्या दुचाकीने अचानक पेट का घेतला? हा तांत्रिक बिघाड होता की अन्य काही कारण, याचा तपास पोलिस करत आहेत.

पत्नीच्या डोळ्यादेखत पती आगीच्या विळख्यात

सिमन यांच्या पत्नी व मुलगा दुसऱ्या दुचाकीवरुन पाठीमागून येत होते, त्यांच्या डोळ्यादेखत पतीला आगीने घेरले होते. पत्नी, मुलाने शर्थीचे प्रयत्न केले, पण आग विझविण्यात यश आले नाही. यानंतर पत्नीने एकच आक्रोश केला, त्यामुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Gadchiroli: Man Dies in Blaze After Motorcycle Catches Fire

Web Summary : A man returning from matchmaking died near Etapalli, Gadchiroli, when his motorcycle caught fire. Siman Hichami, 42, was engulfed in flames, despite his family's efforts to help. Police are investigating the cause.
टॅग्स :AccidentअपघातGadchiroliगडचिरोली