शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहात होणार आधुनिक पध्दतीने शेती

By admin | Updated: August 28, 2016 01:35 IST

राज्यातील कारागृहांमधील शेती आधुनिक पध्दतीने कसण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

उत्पन्न वाढीस मदत : ट्रॅक्टर खरेदीसाठी गडचिरोली कारागृहाला सहा लाखांचा निधी मंजूरगडचिरोली : राज्यातील कारागृहांमधील शेती आधुनिक पध्दतीने कसण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यभरातील नऊ कारागृहांसाठी ३५ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. गडचिरोली कारागृहासाठी ट्रॅक्टर खरेदीसाठी ६ लाख ९४ हजार रूपयांचा निधी मंजूर केला आहे. कारागृहातील बहुतांश कैद्यांना न्यायालयाकडून सश्रम कारावास सुनावला जातो. एकाच बॅरेकमध्ये दिवसभर राहण्यामुळे कैद्यांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता अधिक राहते. त्यामुळे या कैद्यांकडून त्यांना जमेल ते काम करवून घेतले जाते. बहुतांश कारागृहांमध्ये शेती कसल्या जाते. मात्र शेती कसण्यासाठी लागणारी आधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध नसल्याने पारंपरिकरितीने शेती कसावी लागत होती. त्यामुळे कधीकधी खर्चाच्या तुलनेत उत्पादन कमी होत होते. त्यामुळे कारागृहांना शेती उपयोगी यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, विसापूर खुले कारागृह, पैठण खुले कारागृह, धुळे, नाशिक, नंदूरबार, वाशिम येथीलही कारागृहांना निधी मंजूर केला आहे. गडचिरोली कारागृहात ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी ६ लाख ९४ हजार रूपयांचा निधी मंजूर केला आहे. गडचिरोली कारागृहातील बहुतांश कैदी शेतीच कसत असल्याने येथील कैद्यांसाठी सोयीचे झाले आहे. (नगर प्रतिनिधी)