प्लास्टिक मल्चिंग पद्धतीकडे शेतकऱ्यांचा कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:24 IST2018-07-02T00:24:07+5:302018-07-02T00:24:53+5:30
आरमोरी तालुक्यात धान पिकाच्या लागवडीसाठी सगुणा तसेच प्लास्टिक मल्चिंग पद्धतीचा वापर करण्याकडे शेतकºयांचा कल वाढत चालला आहे. आरमोरी तालुक्यात यावर्षी जवळपास २० हेक्टरवर या पद्धतीने धानाची लागवड करण्यात येत आहे.

प्लास्टिक मल्चिंग पद्धतीकडे शेतकऱ्यांचा कल
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरी तालुक्यात धान पिकाच्या लागवडीसाठी सगुणा तसेच प्लास्टिक मल्चिंग पद्धतीचा वापर करण्याकडे शेतकºयांचा कल वाढत चालला आहे. आरमोरी तालुक्यात यावर्षी जवळपास २० हेक्टरवर या पद्धतीने धानाची लागवड करण्यात येत आहे.
धानाच्या पारंपरिक पद्धतीमध्ये धानाचे पºहे टाकून पाऊस आल्यानंतर चिखलणी करून रोवणी करावी लागते. यामध्ये रोवणीसाठी बराच खर्च येतो. त्यानंतर निंदणही काढावे लागते. सगुणा पध्दतीमध्ये वाफे तयार केली जातात. या वाफ्यांवर धानाचे बियाणे संयंत्राच्या सहाय्याने रोवले जातात. प्लास्टिक मल्चिंग पध्दतीमध्ये प्लास्टिक अंथरली जाते. सदर प्लास्टिकला काही प्रमाणात छिद्र पाडून त्यावर बियाणे टाकली जातात. प्लास्टिक मल्चिंग ही अभिनव पध्दत आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली. त्याचे प्रयोग व प्रात्यक्षिक जिल्हाभरात सुरू आहेत. प्लास्टिक मल्चिंगमध्ये धानासह इतर तीन पिके घेणे शक्य आहे. चिखल करण्याचा खर्च यामुळे वाढण्यास मदत होते. सुक्ष्म जीवानूंचे त्रियाणवयन वाढून पिकास अन्न द्रव्य उपलब्ध होतात. मातीत ओलावा टिकवून ठेवणे सुध्दा शक्य आहे.
आरमोरी येथील किशोर गोंदोळे, देवानंद दुमाने, श्रीकांत डोकरे, कैलाश कोहले, अमोल मारकवार, पोटफोडे, गुलधे, विहिरगाव येथील सचिन सपाटे, सुकाळा येथील विलास चौधरी यांच्या शेतात मागील तीन वर्षांपासून या पध्दतीने लागवड केली जात आहे. या शेतकºयांचे अनुकरण करीत इतरही शेतकरी प्लास्टिक मल्चिंग पध्दतीने धानाची लागवड करीत आहेत. त्यामुळे दरवर्षी क्षेत्र वाढत चालले आहे.