शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याच्या घरचे सामान केले जप्त

By admin | Updated: June 30, 2015 02:13 IST

आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथील शेतकरी खेमराज सामृतवार यांच्या घरावर सोमवारी सकाळी गडचिरोली जिल्हा

ठाणेगाव : आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथील शेतकरी खेमराज सामृतवार यांच्या घरावर सोमवारी सकाळी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वसुली पथकाने धडक देऊन पोलिसांच्या उपस्थितीत त्यांच्या घरातील सामान जप्त करून नेले. या कारवाईमुळे शेतकरी कुटुंब प्रचंड दडपणात आले आहे. गावात आपली बेअब्रू झाल्याने आत्महत्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे शेतकरी खेमराज सामृतवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.खेमराज सामृतवार यांनी १२ सप्टेंबर २०१० ला नाबार्डच्या सहाय्याने (५० टक्के लाभार्थी ५० टक्के नाबार्ड) दुग्ध व्यवसायाकरिता २ लाख ६५ हजार ९५६ रूपयाचे कर्ज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आरमोरी शाखेकडून घेतले होते. परंतु त्यानंतर कुठल्याही प्रकारच्या कर्जाचा भरणा लाभार्थी व नाबार्ड यांच्याकडून करण्यात आला नाही. त्यामुळे बँकेने २० जानेवारी २०१४ ला कर्ज मागणीचा पहिला नोटीस पाठविला. त्यानंतर १९ एप्रिल २०१४ ला दुसरा नोटीस पाठविला. परंतु लाभार्थी व नाबार्ड यांनी बँकेच्या या नोटीसला कुठलीही दाद दिली नाही व कर्जाचा भरणाही केला नाही. तेव्हा बँकेने जप्तीपुर्वीचा नोटीस १९ आॅक्टोबर २०१४ ला पाठविला. सदर कर्जावर मार्च २०१३ अखेरपर्यंत ५६ हजार ४१२ रूपये व्याज झालेले आहे. त्यामुळे जप्तीची कारवाई करण्यात आली. या कारवाईबाबत माहिती देताना जिल्हा सहकारी बँकेच्या वसुली पथकाचे प्रमुख गिरीष नरड म्हणाले की, आमच्या पथकाने सोमवारी त्यांच्या घरी भेट देऊन कर्ज भरण्याबाबत त्यांना विचारणा केली. परंतु त्यांनी असमर्थता दर्शवून उडवाउडवीचे उत्तर दिले व टाळाटाळ केली. त्यामुळे पोलिसांना बोलावून ५० हजार रूपये रक्क्म भरण्यास सांगितले. परंतु ते भरण्यासही असमर्थता दर्शविली. २० हजार रूपये भरण्याबाबतही कुठलीही गोष्ट केली नाही. सदर कारवाई ही सूड भावनेने झालेली नसून मागील दोन महिन्यांपासून जिल्हाभरासह चामोर्शी, कुरखेडा तालुक्यातही अशा कारवाया करण्यात आल्या आहे. ठाणेगाव येथील सोनवणे यांनी २५ हजार रूपये भरले, अशी माहितीही त्यांनी दिली. शेतीचा हंगाम असला तरी ही कारवाई नियमानुसारच झालेली आहे, असे ते म्हणाले. बँकेच्या या कारवाईची ठाणेगावसह पंचक्रोशीत चर्चा होती. काय म्हणतात शेतकरी सामृतवार?मात्र शेतकरी खेमराज सामृतवार यांनी आपण करीत असलेल्या दुग्ध व्यवसायातून कुठलाही नफा आपल्याला झालेला नाही. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसातरी चालत आहे. माझी परिस्थिती कर्ज भरण्याची नाही. त्यामुळे मी परतफेड करू शकलो नाही. आज दुसऱ्याकडून मागून २० हजार रूपये भरण्याची तयारी दर्शविली होती. परंतु पथकातील अधिकाऱ्यांनी ५० हजार रूपयेच भरावे लागतील, असे सांगितले. एक-दोन दिवसांची मुदत द्या, अशी मागणी केली. परंतु तीही फेटाळून लावली व पोलीस आणून माझ्या घरातील सामान जबरदस्तीने उचलून नेले. या घटनेमुळे आपल्या अभू्रला डाग लागला आहे. आत्महत्येशिवाय पर्याय नाही, अशी हतबल भावना त्यांनी व्यक्त केली.काय साहित्य नेले शेतकऱ्याच्या घरून?ठाणेगाव येथील खेमराज सामृतवार यांच्या घरी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वसुली पथकाने २९ जून २०१५ ला सामृतवार यांच्या घरी जप्तीची कारवाई केली. त्यांच्याकडील फ्रीज, कुलर, टीव्ही, दिवाण, टी-टेबल, लाकडी टेबल, हिरोहोंडा कंपनीची मोटार सायकल जप्त केली.