शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 06:00 IST

या उद्घाटन विभागीय कृषी अधिकारी अनंत पोटे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, अध्यक्ष आदर्श शेतकरी गट भुवनेश्वर चुधरी, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे व कृषी विभागातील कर्मचारी उपस्थित होते. कृषी विभागाच्या सर्व कार्यालयांमध्ये तालुका व जिल्हास्तरावर हा कक्ष स्थापन केला जाणार आहे.

ठळक मुद्देअपर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन । शेतकऱ्यांच्या अडचणी, तांत्रिक समस्यांचे निराकरण होणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेतकºयांना येणाºया अडचणी, तांत्रिक समस्यांचे निराकरण व आवश्यक मार्गदर्शनासाठी एक खिडकी तत्त्वावर जिल्ह्यात शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. गडचिरोली येथील मार्गदर्शन कक्षाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांच्या हस्ते झाले.या उद्घाटन विभागीय कृषी अधिकारी अनंत पोटे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, अध्यक्ष आदर्श शेतकरी गट भुवनेश्वर चुधरी, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे व कृषी विभागातील कर्मचारी उपस्थित होते. कृषी विभागाच्या सर्व कार्यालयांमध्ये तालुका व जिल्हास्तरावर हा कक्ष स्थापन केला जाणार आहे. या शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्षामध्ये शेतकºयांच्या मदतीसाठी जनसंपर्क व मार्गदर्शन अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. सदर अधिकारी शेतकºयाला आवश्यक मदत संबंधित विभागाच्या शाखेकडून करणार आहेत. मार्गदर्शन कक्षाला भेट देणाºया शेतकºयांची माहिती व त्यांच्या समस्या, केलेली मदत याबाबत नोंदी ठेवल्या जाणार आहेत. या कक्षात शेतकºयांना आवश्यक माहिती पुस्तिका, वाचन साहित्य उपलब्ध केले जाणार आहे. शेतकºयांच्या शेतमालाची उत्पादकता व उत्पन्नात सातत्य ठेवण्याकरिता शासनाच्या विविध यंत्रणांकडून शेतकºयांसाठी राबविण्यात येणाºया योजनांच्या अंमलबजावणीमध्ये समन्वय साधून या कक्षामार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. या ठिकाणी संगणीकृत शेतीविषयक माहिती देणारे यंत्रही बसविण्यात आले आहे. शुक्रवारी जिल्हास्तरावर उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय व तालुका कृषी कार्यालय, गडचिरोली येथे कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.तालुकास्तरावर समन्वय समितीसमस्यांचे निराकरण करण्याकरिता तालुकास्तरावर समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीत अध्यक्ष तहसीलदार, सदस्य सचिव तालुका कृषी अधिकारी तर सदस्य म्हणून गटविकास अधिकारी, पं.स. पशुधन विकास अधिकारी, जलसिंचन उपअभियंता, कृषी विद्यापीठ/संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ प्रतिनिधी, पं.स.कृषी अधिकारी मत्स्य उद्योग, रेशीम, खादी ग्रामोद्योग, विभागाचे प्रतिनिधी, एमएसईबी अभियंता, लीड बँक प्रतिनिधी, सहकारी संस्थेचे सहायक निबंधक, कृउबासचे सचिव, एका महिला शेतकºयासह किमान तीन प्रगतशील शेतकरी आदींचा समावेश आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी