मानसिक तणावाने त्रस्त शेतकऱ्याने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 20:50 IST2021-08-03T20:49:50+5:302021-08-03T20:50:43+5:30
तालुक्यातील वडधा या गावातील रहिवासी असलेल्या शेतकरी किशोर दुधराम राऊत (४५ वर्ष) यांनी मानसिक तणावातून झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.

मानसिक तणावाने त्रस्त शेतकऱ्याने घेतला गळफास
आरमोरी : तालुक्यातील वडधा या गावातील रहिवासी असलेल्या शेतकरी किशोर दुधराम राऊत (४५ वर्ष) यांनी मानसिक तणावातून झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार राऊत यांच्या घरामागेच त्यांची आमराई आहे. पण कोणत्यातरी कारणामुळे ते मानसिक तणावात होते. यातूनच मंगळवारी दुपारी त्यांनी आमराईतील एका आंब्याच्या झाडावर गळफास लावून घेतला. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी आरमोरी पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. मृत राऊत यांच्या मागे पत्नी व २ मुले असा आप्त परिवार आहे.