कीटकनाशकाच्या विषबाधेने शेतकऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 19:37 IST2018-07-07T19:37:06+5:302018-07-07T19:37:16+5:30
शेतात कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा झाल्याने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शेतक-याचा शुक्रवारी मध्यरात्री मृत्यू झाला.

कीटकनाशकाच्या विषबाधेने शेतकऱ्याचा मृत्यू
गडचिरोली : शेतात कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा झाल्याने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शेतक-याचा शुक्रवारी मध्यरात्री मृत्यू झाला. अधिकराव हिरामन सयाम (४५) रा. धुंडेशिवणी ता. गडचिरोली असे मृतक शेतक-याचे नाव आहे. ते ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होते. २८ जून रोजी सकाळी शेतात फवारणी केल्यानंतर अधिकराव हे सायंकाळी घरी परत आले.
रात्री त्यांची प्रकृती बिघडल्याने २९ जून रोजी त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. याच ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. अधिकराव सयाम यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. मागील वर्षी फवारणी करताना विदर्भातील अनेक शेतकºयांचा मृत्यू झाला. यावर्षीच्या हंगामात कीटकनाशकांच्या फवारणीदरम्यान विषबाधेने मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना असावी.