शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

मुदतबाह्य खाद्यपदार्थ केले नष्ट

By admin | Updated: September 2, 2016 01:21 IST

गडचिरोली येथील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी देसाईगंज येथील सनी कन्फेक्शनी दुकानाच्या

देसाईगंज कन्फेक्शनरीच्या गोदामात धाड : अन्न व औषध प्रशासनाची कारवाईदेसाईगंज : गडचिरोली येथील अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी देसाईगंज येथील सनी कन्फेक्शनी दुकानाच्या गोदामामध्ये धाड टाकून मुदतबाह्य व उत्पादनाची तारीख नसलेल्या ८३ हजार ७०० रूपये किमतीच्या खाद्य पदार्थांचा साठा जप्त करून पंचनाम्यानंतर सदर खाद्यपदार्थाचा साठा जाळून नष्ट केला. देसाईगंज येथील प्रकाश कन्हैय्यालाल उदासी यांच्या मालकीचे सनी कन्फेक्शनी नावाचे देसाईगंज बाजारपेठेत दुकान आहे. उदासी यांचे गोदाम जे. डांगे राईसमिल परिसरात आहे. या गोदामात मुदतबाह्य खाद्य पदार्थ साठवणूक करून ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती गडचिरोली येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त देशपांडे यांना मिळाली. त्यांनी आपल्या सहकारी, अधिकारी कर्मचाऱ्यांसह देसाईगंज येथील सदर गोदामात बुधवारी धाड टाकली. यावेळी मुदतबाह्य व उत्पादनाची तारीख नसलेले नमकिन, फरसान, फ्रायम व फिगर आदी प्रकारच्या अन्न पदार्थाचा साठा आढळून आला. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी येथून मुदतबाह्य व उत्पादनाची तारीख नसलेल्या ८३ हजार ७०० रूपये किमतीच्या १५ हजार ४२० पॉकेट इतका खाद्यपदार्थाचा साठा जप्त केला. कारवाईनंतर सदर खाद्यपदार्थाचा साठा जाळून नष्ट करण्यात आला. सदर कारवाई अन्न व औषध प्रशासन नागपूर विभागाचे सहआयुक्त केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली येथील सहायक आयुक्त (अन्न) देशपांडे, सहायक आयुक्त पवार, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता) महाजन, नागपूरचे अन्न सुरक्षा अधिकारी वसावे, चंद्रपूरचे अन्न सुरक्षा अधिकारी चौधरी, गडचिरोलीचे अन्न सुरक्षा अधिकारी गिरीष सातकर यांच्या पथकाने केली. अन्न व औषध प्रशासनाच्या सदर कारवाईमुळे देसाईगंज तालुक्यासह जिल्हाभरात मुदतबाह्य तसेच उत्पादनााची तारीख नसलेल्या पॉकेटबंद खाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. विशेष म्हणजे, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देसाईगंज येथे सदर दुकानात कारवाई केली होती. सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने करवाई करावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)