शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
2
Top Marathi News LIVE Updates: हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला नागपुरातून अटक
3
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
4
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
5
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
6
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
7
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
8
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
9
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
10
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
11
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
12
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
13
भोंदू खरातसोबत कथित व्यवहार प्रकरण; रुपाली चाकणकर यांची साडेआठ तास ईडी चौकशी
14
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
15
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
16
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
17
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
18
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
19
Mumbai Murder: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
20
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी घेणार शिक्षकांची परीक्षा

By admin | Updated: January 3, 2015 01:16 IST

स्थानिक धानोरा मार्गावरील शिवाजी कला महाविद्यालयात ५ ते ७ जानेवारी रोजी ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवादरम्यान शिक्षकांची सामान्य ज्ञान परीक्षा घेतली जाणार आहे.

गडचिरोली : स्थानिक धानोरा मार्गावरील शिवाजी कला महाविद्यालयात ५ ते ७ जानेवारी रोजी ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवादरम्यान शिक्षकांची सामान्य ज्ञान परीक्षा घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे ही परीक्षा विद्यार्थी घेणार आहेत. त्यामुळे या परीक्षेविषयी विद्यार्थी व शिक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पसरली आहे.
जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व मराठी भाषा विभाग तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथे ग्रंथ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रंथ महोत्सवाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढावा, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा, यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी तिनही दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
या सर्व कार्यक्रमांमध्ये शिक्षकांची सामान्य ज्ञान परीक्षा विद्यार्थ्यांकडून घेतली जाणार आहे. या कार्यक्रमाची विशेष उत्सुकता विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. सामान्य ज्ञान स्पर्धेत सहभागी होऊ इच्छीनाऱ्या शिक्षकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये १६ शिक्षकांना सहभाग घेता येणार आहे. यामध्ये प्रत्येकी ४ शिक्षकांचे ४ गट पाडण्यात आले आहेत. या सामान्य ज्ञान स्पर्धेच्या चार फेऱ्या असून पहिल्या फेरीमध्ये सामाजिकशास्त्र, दुसऱ्या फेरीमध्ये विज्ञान, तिसऱ्या फेरीमध्ये संगीत व चवथ्या फेरीत रॅपीड फायर पद्धतीने प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रत्येक फेरीमध्ये पाच प्रश्नांचा अंतरभाव राहणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेचे संचालन, परिक्षण व इतर सर्व बाबी विद्यार्थीच सांभाळणार आहेत.
आजपर्यंतच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये शिक्षकांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. त्यामुळे कार्यक्रम आयोजनाची संधी विद्यार्थ्यांना मिळत नाही. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता प्राप्त व्हावी, त्यांच्या ज्ञानकक्षा वृंदावाव्या यासाठी या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन शिक्षण विभागाने केले आहे. हा आगळावेगळा कार्यक्रम बघण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. सदर कार्यक्रम ७ जानेवारी रोजी आयोजित केला जाणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी उल्हास नरड, प्रा. अविनाश गौरकर, विशेष प्रयत्न करीत आहेत. (नगर प्रतिनिधी)