शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

शेवटच्या घटकापर्यंत सर्वांना न्याय मिळेल

By admin | Updated: February 2, 2016 01:23 IST

शिक्षणाने जग जिंकता येते, त्यासाठी शस्त्राची गरज नाही. न्याय पालिकेवर सर्वसामान्यांना जाती, समाज, लैंगिक भेद न करताना सर्वसामान्यांना समान न्याय देण्याची जबाबदारी आहे.

भूषण गवई यांचे प्रतिपादन : आरमोरीत न्यायालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटनआरमोरी : शिक्षणाने जग जिंकता येते, त्यासाठी शस्त्राची गरज नाही. न्याय पालिकेवर सर्वसामान्यांना जाती, समाज, लैंगिक भेद न करताना सर्वसामान्यांना समान न्याय देण्याची जबाबदारी आहे. आरमोरी येथील न्यायालयाची नवी इमारत एक आदर्श असून येथून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सर्वांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केली. आरमोरी येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारतीचे रविवारी त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नागपूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रदीप देशमुख, प्रमुख जिल्हासत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे, यवतमाळचे प्रमुख जिल्हासत्र न्यायाधीश डी. आर. शिरासाव, सेवानिवृत्त प्रमुख जिल्हासत्र न्यायाधीश अहमद, जिल्हाधिकारी रणजितकुमार, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे, जिल्हा अधिवक्ता संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद बोरावार, जिल्हा शासकीय अभियोक्ता सचिन प्रधान, वरिष्ठ अधिवक्ता विजय न्यालेवार, देसाईगंज अधिवक्ता संघाचे अध्यक्ष वारजुकर उपस्थित होते. सन २०१५-१६ या वित्तीय वर्षात सहा कोटी रूपये निधीतून ही इमारत उभी करण्यात आली आहे, अशी माहिती प्रमुख जिल्हासत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी मार्गदर्शनात दिली. सदर तीन मजली इमारतीत दोन न्यायालयाचे कामकाज होऊ शकेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. इमारतीमध्ये कोर्ट हॉल, संगणक कक्ष, व्हिडीओ कॉन्फरन्स कक्ष, सभा कक्ष, मध्यस्थी केंद्रासाठी स्वतंत्र सभागृह, स्वतंत्र ग्रंथालय, महिला व पुरूष पक्षकारांना बसण्याची सोय, पाण्याची सोय, शौचालयाची सोय आदी सुविधा उपलब्ध करण्यात आले आहे. यावेळी न्यायालय परिसरात न्यायमूर्तींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी कंत्राटदार तन्मय मेंढे यांचा तसेच कार्यकारी बांधकाम विभागाचे अभियंता यांचाही न्यायाधीशांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आरमोरी बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. पी. ढोरे यांनी जिल्हासत्र न्यायाधीश शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे ३ कोटी ३१ लाख ५८ हजार रूपये निधीतून आरमोरी येथे ही सूसज्ज इमारत उभी झाली. येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व मुख्य न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालय सुरू करण्यात यावा, अशी मागणी केली. कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड. कविता मोहरकर यांनी तर आभार दिवाणी न्यायाधीश दि. रा. भोला यांनी मानले. कार्यक्रमाला वकील उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)